मानवी शरीर आणि त्याच्याशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत, जे कधी कधी मेडिकल सायन्स संबधित लोकांना हैराण करतात. खासकरून गर्भधारणा होणे आणि बाळाचा जन्म होणे. जी अनेक घटनांची साक्षीदार बनते, जे पाहिल्यानंतर मानून थक्क होतो. अशीच एक घटना ब्राझील मधून समोर आली आहे जिथे एका १९ वर्षाच्या मुलीला जुळे झाले आहेत, जी खूपच असाधारण आहे.
हि जगातील २० वी केस आहे आणि जुळ्या मुलांचे आईवडील वेगवेगळे आहेत. अशा प्रकारच्या केसला मेडिकल सायन्सच्या भाषेमध्ये हेट्रोपैरेंटल सुपरफेक्यूंडेशन म्हंटले जाते. सामान्यतः जुळ्या मुलांचे वडील एकच असतात पण जगामध्ये करोडोमधील एक प्रकरणामध्ये असे होते. ज्यामध्ये जुळ्या मुलांचे बायलॉजिकल फादर वेगवेगळे असतात. असेच काही ब्राझीलच्या एका तरुणीसोबत झाले आहे.
ब्राझील मध्ये राहणारी १९ वर्षाच्या मुलीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामधील एक बाळाचा चेहरा त्या वडील म्हणून घेतलेल्या व्यक्तीशी मिळताजुळता नव्हता, अशामध्ये त्याने त्या मुलांची डीएनए टेस्ट केली. ज्यामध्ये असे समोर आले कि तो व्यक्ती फक्त एकाच बाळाचा बाप आहे.
तर दुसऱ्या बाळाची टेस्ट निगेटिव आली. जेव्हा त्या मुलीला दुसया व्यक्तीसोबतच्या रिलेशनबद्दल आठवले तेव्हा त्यांनी दुसऱ्या मुलाचा डीएनए त्याच्यासोबत मॅच करून बघितला, जो एकदम तंतोतंत मॅच झाला. अशा प्रकारच्या कंडीशनला लोक हेट्रोपैरेंटल सुपरफेक्यूंडेशन म्हणतात.
डॉ. तुलिओ जॉर्ज फ्रँको यांच्यामते जगामध्ये हे २० वे हेट्रोपैरेंटल सुपरफेक्यूंडेशनचे प्रकरण आहे. अशी प्रेग्नंसी तेव्हा होते जेव्हा आईचे दोन एग्स दोन वेगवेगळ्या पुरुषांच्या स्पर्मने फर्टिलाइज़ होतात. त्यांचा जेनेटिक मटीरियल आईचे असते पण प्लेसेंटा वेगळे असतात. अशाप्रकारे माणसामध्ये कमी पण प्राण्यांमध्ये हि प्रकरणे जास्त आढळतात. जर जन्माच्या अगोदर जुळ्या मुलांबद्दल पॅटरनिटी टेस्ट केली तर यामुळे मिसकॅरेजचा धोका होऊ शकतो.