आरोग्यासाठी छोटा पॅक मोठा धमाका आहे इलायची, दिवसातुन १ वेळा इलायची खाल्याने मिळतील हे ६ आरोग्यवर्धक फायदे !

By Viraltm Team

Published on:

आपल्याकडे लोक स्वादिष्ट आणि रुचकर आहार पसंत करतात, आणि प्रत्येक स्त्रीचा हा प्रयत्न असतो की, तिने अतिउत्तम पकवान बनवावे. त्यासाठी ती अनेक प्रकारच्या वस्तूंचा वापर करत असते, जसे अद्रक, इलायची, लवंग, इत्यादी.

इलायची, चवीसाठी आणि स्वास्थ्यासाठी अति उत्तम मानली जाते. इलायची एक स्वादिष्ट आणि सुगंधित मसाला असतो जो प्रत्येकाला पसंत असतो. सामान्यतः इलायचीचा वापर अन्नात मसाल्याच्या रुपाने करतात.

साधारणतः,गोड पदार्थांत याचा वापर जास्त केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? इलायचीत अनेक हेल्थ बेनिफिट्स म्हणजेच इलायचीत अनेक आरोग्याचे फायदे ही असतात. हेच कारण आहे की, याचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांत ही केला जातो. अशात आम्ही तुम्हाला इलायची खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

अपचन क्रिया होईल दूर :- अपचन होत असल्यास इलायची स्वस्थपणा देते. यापासून तुम्हाला होत असलेली ॲसिडिटीची समस्या ही दूर होते, यासाठी तुम्ही तोंडात इलायची ठेवा आणि नंतर थोडे मोकळ्या हवेत फिरा. अपचन पासून तुमची सुटका होईल.

तोंडाचा दुर्गंध करा दूर :- इलायचीचा तुम्ही माउथ फ्रेशनर प्रमाणे वापर करू शकता. हे खाल्ल्याने तोंडातून येणारा दुर्गंध दूर होतो, यासाठी जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीचे समस्या आहे, तर तुम्हाला दररोज एक इलायची अवश्य खायला पाहिजे.

शरीरातील विष काढा बाहेर :- इलायची खाल्ल्याने तुमच्या शरीरातील विष म्हणजेच विषारी पदार्थ खूप सहजतेने बाहेर निघून जातात. यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे आढळून येतात. हे आपल्या स्वास्थासाठी लाभकारी असतात.

ब्लड प्रेशर करा नियंत्रित :- इलायची खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते, रक्तदाब असलेल्या व्यक्तींना याचे सेवन दररोज करायला पाहिजे.

पोटातील गॅस समस्या :- इलायची पोट साफ करण्यासाठी खूप लाभदायी ठरते, खास करून जर तुम्हाला गॅसची समस्या राहत‌ असेल, तर दररोज दोन इलायची खाल्ल्याने आराम मिळेल. यापासून तुम्हाला अन्न पचवण्यासाठी मदत मिळेल.

सर्दी खोकल्यात ही लाभकारी :- खोकला लागल्यावर इलायची खाने आरोग्यासाठी लाभदायी ठरते. तसेच सर्दी झाल्यावर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यावर, इलायची च्या तेलाची काही थेंब पाण्यात टाकून वाफ घ्यायला पाहिजे. यापासून तुमच्या या समस्येचे समाधान होईल. यापासून तुमच्या छातीत जमा झालेला कफ हि साफ होईल.

याप्रकारे इलायची चे अधिक लाभ आहेत, त्यामुळे तुम्ही दररोज याचे सेवन करा. याचे सेवन तुम्ही सहजरीत्या घेऊ शकता, किंवा एखाद्या आहारात सामील करून ही घेऊ शकता. उदाहरणासाठी, चहा किंवा दुधात इलायची दररोज टाकून खाऊ शकता, किंवा जेवण झाल्यावर तोंड साफ करण्यासाठी इलायची खाऊ शकता.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment