IND vs SA: टीम इंडियामध्ये परतल्यानंतर Yuzvendra Chahal झाला भावूक, चार शब्दांची रिएक्शन व्हायरल

By Viraltm Team

Updated on:

Yuzvendra Chahal

IND vs SA: डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी Yuzvendra Chahal ची भारतीय वनडे संघामध्ये निवड झाली आहे.अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. 2023 वर्ल्डकप वनडे संघामध्ये 15 सदस्यीय टीम मधील 12 खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. तर दीर्घकाळानंतर Yuzvendra Chahal चे भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे.

बराच काळ टीम इंडियामधून बाहेर असलेल्या युजवेंद्र चहल साठी गुरुवारचा दिवसा आनंदाचा ठरला. डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी चहलची भारतीय वनडे संघामध्ये निवड झाली आहे. मात्र चहलला टी-20 संघामध्ये सामील केले गेले अन्ही. वनडे संघामध्ये पुनरागमन केल्यानंतर चहलने सुंदर प्रतिक्रिया दिली आहे.

Yuzvendra Chahal ने सोशल मिडियावर शेयर केली पोस्ट

चहलने X हँडलवर वर चार शब्दांमध्ये एक पोस्ट शेयर केली आहे. युजवेंद्र फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये “Here we go AGAIN!” असे लिहिले आहे. चहल बद्दल बोलायचे झाले तर तो भारतासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटचे वेस्टइंडीज दौऱ्यासाठी खेळताना दिसला होता. 2023 आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठी त्याची निवड झाली नव्हती.

Yuzvendra Chahal

न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता शेवटची वनडे

साउथ अफ्रीका दौऱ्यासाठी निवड झालेल्या वनडे संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. टीममध्ये एकूण चार स्पिनर सामील करण्यात आले आहेत. कुलदीप यादव आणि चहल शिवाय ऑलराउंडर अक्षर पटेल आणि वॉशिंगटन सुंदर यांची देखील निवड करण्यात आली आहे. टीन सामन्यांची वनडे सिरीज 17 डिसेंबर पासून 21 डिसेंबर पर्यंत खेळवली जाणार आहे. चहलने भारतासाठी जानेवारी 2023 मध्ये न्युझीलंडविरुद्ध शेवटची वनडे खेळली होती.