सोहेल खानसोबतच्या घटस्फोटानंतर सीमा सजदेहने केला मोठा खुलासा, म्हणाली; मला पुरुषांपेक्षा मुली खूप आवडतात कारण त्यांची…

By Viraltm Team

Published on:

भले सीमा सजदेह आणि सोहेल खान घटस्फोट घेऊन वेगळे झाले आहेत पण तरीही सीमा सजदेह सतत चर्चेमध्ये आहे. २२ वर्षानंतर सीमा सजदेह आणि सोहेल खान घटस्फोट घेऊन वेगळे झाले आहेत. दोघांना दोन मुले देखील आहेत तथापि आई-वडील या नात्याने ते मिळून दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहेत.

यादरम्यान फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’चा दुसरा सीजन आला आहे. याआधी पहिल्या सीजनला दर्शकांकडून भरभरून प्रेम मिळाले होते. आता दुसरा सीजन नेटफ्लिक्सवर आला आहे. या शोमध्ये सीमा सजदेहने हजेरी लावून आपल्या घटस्फोटाबद्दल आणि आपल्या आवडी-निवडीबद्दल उघडपणे चर्चा केली.

शोमध्ये सीमा सजदेह शिवाय महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी देखील दिसणार आहेत. शोमध्ये बोल्डनेसचा तडका लाव्ल्यासाठी मॅच मेकर सीमा टापरियाची एंट्री झाली आहे. सीमा टापरियासमोरच सीमाने आपल्या पर्सनल लाईफसंबंधी अनेक गुपिते उघड केली. शोमध्ये सीमा टापरिया सीमासोबत परफेक्ट मॅच संबंधी विचारते. ती विचारते कि २२ वर्षानंतर घटस्फोट का घेतला.

याचे उत्तर देताना सीमा म्हणते कि आमच्या मनामध्ये कधीच आले नव्हते. सीमा टापरिया म्हणते कि हि गोष्ट माहिती होण्यासाठी तुम्हाला २२ वर्षे लागली. याचे उत्तर टाळण्याचा प्रयत्न करत सीमा म्हणते कि तिला मुली पसंद आहेत आणि जोरजोरात हसू लागले. सीमा टापरिया म्हणते कि हा चांगला मार्ग आहे उत्तर देण्याचा. तू प्रश्नाला घाबरलीस.

तेव्हा महीप कपूर सीमा टापरियाला म्हणते कि तू सीमासाठी मुली शोधशील का ? यावर उत्तर देताना सीमा टापरिया म्हणते कि बिलकुल देखील नाही. आपला देश इतका देखील पुढे गेलेला नाही. असो शो खूपच मनोरंजक होणार आहे कारण शोमध्ये सीमा सजदेह शिवाय महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी अनेक मजेदार खुलासे करणार आहेत. या शोमध्ये या चार स्टार्सची लाईफ पाहायला मिळणार आहे. सीमा सजदेह बद्दल बोलायचे झाले तर ती व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.

Leave a Comment