हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनने आपले वडील राकेश रोशनपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन जुन्या काळामधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक राहिले आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे आणि नंतर चित्रपटांचे दिग्दर्शन करायला सुरुवात केली.
राकेश रोशन आणि हृतिक रोशन या पिता-पुत्राची जोडी खूपच फेमस जोडींपैकी एक आहे. दोघे आपल्या कामामुळे प्रसिद्धी मिळवण्यात सफल झाले आहेत. हृतिकने आपल्या कामासोबत आपल्या लुक्स आणि हेयर स्टाईलने सर्वाना वेड लावले आहे. तर दुसरीकडे हृतिकचे वडील राकेस रोशन नेहमी टकलेच दिसतात. अनेक वर्षांपासून राकेश रोशन बिना केसांचे दिसत आहे. पण यामागे कोणते कारण आहे.
राकेश रोशन नेहमी टकले राहण्याचे मोठे कारण आहे. जेव्हा देखील तुम्ही याबद्दल जाणून घ्याल तेव्हा तुम्ही देखील हैराण व्हाल. आज ७२ व्या वर्षी देखील राकेश रोशन खूपच हँडसम दिसतात. पण त्यांच्या डोक्यावर कधीच केस दिसत नाहीत ते नेहमी टकले राहतात.
अनेक वेळा मिडियामध्ये अशा बातम्या आल्या आहे कि आजारपणामुळे राकेश रोशनचे संपूर्ण केस गळाले होते पण हे खरे नाही. कोणत्याही आजारामुळे ते टकले नाहीत तर यामागे एक खास कारण आहे. हि गोष्ट १९८७ ची आहे जेव्हा राकेश रोशनचा खुदगर्ज चित्रपट आला होता.
राकेश रोशनने सुरुवातीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता म्हणून काम केले होते. यानंतर त्यांनी फिल्मी जगतामध्ये एक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरवात केली. दिग्दर्शकाच्या रुपामध्ये त्यांचा पहिला चित्रपट खुदगर्ज होता. १९८७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या सफलतेसाठी राकेश रोशन तिरुपतिच्या दर्शनाला पोहोचले होते. तेव्हा त्यांनी एक नवस मागितला होता कि चित्रपट सफल झाला तर ते आपल्या केसांचे दान करतील.
१९८७ मध्ये रिलीज झालेला खुदगर्ज चित्रपट ३१ जुलैला चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला होता. या चित्रपटामध्ये गोविंदा, नीलम कोठारी, कादर खान, शत्रुघ्न सिन्हा, जीतेन्द्र, अमृता सिंह या कलाकारांनी काम केले होते. चित्रपट सुपरहिट झाला होता. पण राकेश रोशन आपला नवस विसरून गेले. त्यांनी आपल्या पत्नीला यासंबंधी सांगितले. यानंतर ते तिरुपतीला गेले आणि आपले केस दान केले. त्याचबरोबर त्यांनी हि देखील शपथ घेतली कि आता ते डोक्यावर कधीच केस ठेवणार नाहीत.