बॉलीवूड मधील सर्व लोकांच्या प्रेमकथा खूपच प्रसिद्ध आहेत. प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीचे एक्स्ट्रा अफेअर् असतात. ते नको असताना देखील जगासमोर उघड होतात. या एक्स्ट्रा अफेअर पासून आजचीच पिढी नाही तर महानायक अमिताभ बच्चन देखील वाचू शकले नाहीत.
प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअर च्या गोष्टी सर्वांनी ऐकलेल्या आहेत. त्यांच्या प्रेमकथा सामान्य वाटत आहेत. तथापि आजपर्यंत दोघांपैकी कोणीही त्याचा स्वीकार केलेला नाही. दोघांनी त्यांच्या काळामध्ये अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
या दोघांची जोडी सर्वांना पसंत देखील येत होती. दोघांना एकत्र अनेकवेळा पाहिले गेले आहे. परंतु अमिताभ बच्चन आणि रेखा ने कधीही अफेअर च्या बातम्यांचा स्वीकार केला नाही. तर दुसरीकडे या दोघांच्या अफेअर च्या बातम्या आणि त्यांचे एकत्र राहणे जया बच्चन च्या साठी खूपच त्रासदायक ठरत होते. आणि तिने तिच्या पतीला रेखा पासून वेगळे करण्याचा खूप प्रयत्न देखील केला होता.
एकदा तर जया बच्चन ने रेखा आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र बोलताना पाहून एवढी रागावली कि रागाच्या भरात तिने सेटवर सर्वांच्या समोर रेखाच्या गालावर जोरात चापट मारली. जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा शी संबंधित हि घटना चित्रपट ‘राम बलराम’ च्या चित्रिकरणादरम्यान घडलेली आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री रेखा आणि अमिताभ यांना एकत्र कास्ट केले गेले होते. जसे हि गोष्ट जया बच्चन यांना समजली तेव्हा ती खूप नाराज झाली.
जया ने तिच्या ओळखीचा वापर करून त्या चित्रपटामधून रेखा ला काढण्याचा खूप प्रयत्न देखील केला. जया बच्चन ने ‘राम बलराम’ चा दिग्दर्शक टिटो टोनी सोबत बोलताना सांगितले कि त्याने या चित्रपटासाठी जिनत अमान ला निवडावे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी रेखा ने दिग्दर्शकाला बिन मानधन घेता मोफत काम करण्याची अट घातली. त्यामुळे त्याला देखील रेखा ला घ्यावे लागले.