कियारा आडवाणी नुकतीच अक्षय कुमारसोबत लक्ष्मी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली आहे. चित्रपटामध्ये कियाराने देखील उत्कृष्ठ भूमिका साकारली आहे. कियारा आपल्या रिलेशनशिप बद्दल देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असते. असे म्हंटले जाते कि कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे. तथापि कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना फक्त मित्र मानतात. पण कियारा प्रेमावर खूप विश्वास ठेवते आणि कोणती गोष्ट आहे जी ती रिलेशनशिपमध्ये सहन करू शकत नाही.
कियाराने म्हंटले कि मी १० वी मध्ये होते तेव्हा पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये पडले होते. तेव्हा माझ्या आईने मला फोनवर बोलताना पकडले होते. तिने म्हंटले होते कि तुझे बोर्ड एक्झाम येत आहेत आणि तू आपले सर्व लक्ष फक्त अभ्यासावर दे.
कियाराने या दरम्यान हे देखील सांगितले कि माझ्या आई-वडिलांचे लव्ह मॅरेज झाले आहे आणि दोघांचे एकमेकांअगोदर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड होते. तेव्हा आमच्या घरामध्ये नेहमी एक प्रेमळ वातावरण पाहिले आहे. तर मी ज्याला डेट करत होते, तेव्हा विचार करत होते कि त्याच्यासोबतच लग्न करेन. तर मी प्रेम आणि लग्नावर विश्वास ठेवते. कियाराला यादरम्यान विचारले गेले कि ती रिलेशनशिपमध्ये कोणती गोष्ट सहन करू शकत नाही? तेव्हा तिने याचे उत्तर देताना म्हंटले कि मी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करू शकत नाही.
कियारा आणि अक्षयच्या लक्ष्मी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टार वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट केप ऑफ गुड फिल्म्स, तुषार एंटरटेनमेंट हाउस आणि शबीना एंटरटेनमेंटने प्रोड्यूस केला आहे. चित्रपटाचे निर्देशन राघव लॉरेंसने केले आहे. हा तेलगु चित्रपट कंचनाचा रिमेक आहे.