धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर बद्दल हेमा मालिनीने केला सणसणीत खुलासा, लग्नानंतर असे होते दोघींमधील…!

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी ६० च्या दशकापासून चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. हेमा मालिनी आपल्या चित्रपटांसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहिली. हेमा मालिनीने दिग्गज अभिनेता धर्मेंद्रसोबत लग्न केले होते. पण हेमा मालिनीसोबत लग्न करण्याअगोदर देखील धर्मेंद्र विवाहित होते. असे असून देखील त्यांनी धर्म बदलून हेमा मालिनी सोबत लग्न केले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्रने १९८० मध्ये लग्न केले होते. धर्मेंद्रने हेमासोबत लग्न तर केले होते पण आपली पहिली पत्नी प्रकाश कौरला देखील सोडले नाही. धर्मेंद्रचे पहिले लग्न प्रकाश कौरसोबत झाले होते. प्रकाश पासून धर्मेंद्रला दोन मुले सनी देओल आणि बॉबी देओल आहेत. दोन मुले असून देखील धर्मेंद्रचे हृदय हेमा मालिनीवर आले होते आणि दोघांनी लग्न केले.
प्रकाश, धर्मेंद्रला घटस्फोट देऊ इच्छित नव्हती यामुळे धर्मेंद्रने इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी सोबत लग्न केले. धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौरबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. पण एकदा मुलाखती दरम्यान हेमा मालिनीने प्रकाश कौरबद्दल बातचीत केली होती.

आपल्या एका जुन्या मुलाखतीदरम्यान हेमा मालिनीने धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करताना म्हंटले होते कि, मी धरमजी सोबत लग्न जरूर केले आहे पण माझी इच्छा नव्हती कि या लग्नामुळे कोणालाही दुख पोहोचावे. त्यांच्या पहिली पत्नी आणि मुलांना कधीच आपल्या आयुष्यामध्ये माझी दाखल वाटली नाही. मी धर्मेंद्रला लग्नानंतर देखील कधीच आपल्या कुटुंबापासून वेगळे केले नाही.
तर हेमाने आपल्या आणि धर्मेंद्रच्या नात्याबद्दल सांगताना म्हंटले होते कि, मी आणि धर्मेंद्र या वयामध्ये देखील एकमेकांची काळजी घेतो. मी जेव्हा धर्मेंद्रजींना पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा मला माहित झाले होते कि ते माझ्यासाठीच बनले आहेत. मी तेव्हाच ठरवले होते कि या व्यक्तीसोबत मला माझे पूर्ण आयुष्य घालवायचे आहे.

Leave a Comment