बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेमध्ये असते. मलायका गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन कपूर वयाने मलायकापेक्षा लहान आहे. अशामध्ये दोघे आपल्या रिलेशनमुळे ट्रोलर्सच्या नेहमी निशाण्यावर येतात. सध्या मलायका तिच्या मूविंग इन विद मलाइका या रियालिटी शोमध्ये उघडपणे तिच्या पर्सनल लाईफवर बोलताना पाहायला मिळत आहे. मलायकाने पहिल्यांदाच या शोमध्ये अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमुळे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरदरम्यान १२ वर्षाचे अंतर आहे. यामुळे दोघे नेहमी ट्रोल होतात. आता मलायकाने आपल्या शोमध्ये यावर उघडपणे बातचीत केली होती. ती म्हणाली कि दुर्दैवाने मी फक्त मोठीच नाही तर स्वतःपेक्षा वयाने लहान व्यक्तीला डेट करत आहे.
म्हणजेच माझ्यात हिंमत आहे, मी त्याचे आयुष्य खराब करत आहे ? बरोबर बोलले ना ? मी सर्वाना सांगू इच्छिते कि मी त्याचे आयुष्य बरबाद करत नाहीं आहे. असे नव्हते कि तो शाळेमध्ये जात होता आणि आपल्या अभ्यासावर फोकस करू शकत नाही आणि मी त्याला माझ्याजवळ येण्यास सांगितले.
मलायका पुढे म्हणाली कि जेव्हा देखील आम्ही डेट वर जातो तेव्हा याचा अर्थ नाही कि आम्ही क्लास बंक करत आहोत. जेव्हा तो पॉकेमॉन पकडत होता तेव्हा मी त्याला काही रस्त्यावरून पकडले नव्हते. तो मोठा झाला आहे आणि एक पुरुष आहे. आम्ही दोघेही प्रौढ आहोत आणि एकत्र राहण्यास सहमत आहोत. जर एखादा मोठा मुलगा लहान मुलीला डेट करत असेल तर तो प्लेयर आहे पण जेव्हा वयाने मोठी महिला लहान व्यक्तीला डेट करत असेल तर चुकीचे म्हंटले जाते.