इंडियन क्रिकेटर विराट कोहली सध्या टी२० वर्ल्ड कप साठी आस्ट्रेलियामध्ये आहे. यादरम्यान त्याच्या हॉटेलच्या खोलीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे त्याची पत्नी अनुष्का शर्माने व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर विराट कोहलीने यावर संताप व्यक्त केला आहे.
अनुष्का शर्माने नाराजी व्यक्त करत व्हायरल झालेल्या व्हिडीओचा एक स्क्रीनशॉट शेयर करत लिहिले आहे कि काही अशा घटनांचा अनुभव घेतला ज्यामध्ये काही चाहत्यांनी कोणतीच दया किंवा कृपा दाखवली नाही. हि फार वाईट गोष्ट आहे. एका व्यक्तीचा पूर्णपणे अपमान आणि गोपनीयतेचे उल्लंघन आणि जो कोणी हे पाहत आणि विचार करतो कि सेलिब्रिटी आहे तर डील करावी लागते.
विराट कोहलीने व्हिडीओ शेयर करत लिहिले आहे कि मला समजते कि चाहते त्यांचं फेवरेट खेळाडूला पाहून खूपच आनंदी आणि एक्साइटेड होतात आणि त्यांना भेटण्यासाठी देखील एक्साइटेड होतात आणि मी नेहमी याचे कौतुक केले आहे.
हा व्हिडीओ भीतीदायक आहे आणि मला माझ्या गोपनीयतेबद्दल खूपच विचित्र वाटले. जर मी हॉटेलमध्ये एका खोलीमध्ये प्राइवेसी ठेऊ शकत नाही तर मी वास्तवामध्ये कोणत्याही पर्सनल स्पेसची अपेक्षा कशी करू शकतो. कृपया लोकांनी प्राइवेसी सम्मान करावा आणि त्याला मनोरंजन म्हणून घेऊ नका.
तर त्याच्या पोस्टवर सेलेब्स देखील कमेंट करत आहेत. अर्जुन कपूरने कमेंट करत लिहिले आहे कि आज प्रत्येकाजवळ कॅमेरा असण्याचा हा दुखद भाग आहे. वरुण धवनने कमेंट करत लिहिले आहे कि हॉरिबल बिहेवियर तर परिणीती चोप्रा आणि उर्वशी रौतेलाने देखील कमेंट करत हे खूपच वाईट असल्याचे म्हंटले आहे.
View this post on Instagram