साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील मोस्ट पॉपुलर जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील उगवते तारे आहेत. रश्मिका आणि विजय देवराकोंडा यांची जोडी मोठ्या पडद्यावर खूपच पसंद केली जाते. रियल लाईफमध्ये देखील दोघांना खूपच पसंद केले जाते. अनेक दिवसांपसून रश्मिका विजय देवरकोंडाच्या डेटिंगच्या बातम्या समोर येत आहेत. पण नुकेतच दोघांच्या लग्नाचा एक फोटो समोर आला आहे जो खूपच व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील वेगवेगळे अंदाज लावत आहेत.
सोशल मीडियावर रश्मिका आणि विजयचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये विजय देवरकोंडा व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला दिसत हे तर रश्मिका मंदाना क्रीम कलरचा लेहेंगा घातलेली दिसत आहे. हा फोटो समोर येताच सोशल मिडियावर एकच खळबळ उडाली आहे. तथापि थोड्याच वेळामध्ये या फोटोचे सत्य समोर आले, हा फोटो एडिट केलेला फोटो आहे मात्र फोटो समोर आल्यानंतर हा दिवस लवकरच यावा अशी अनेक चाहत्यांनी आशा व्यक्त केली आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा आपल्या फिल्मी करियरमध्ये डियर कॉमरेड, वर्ल्ड फेमस लवर, गीता गोविंदम सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा विजय अभिनेत्री अनन्या पांडेसोबत करण जोहरच्या शोमध्ये पोहोचला होता तेव्हा जवळजवळ दोघांच्या रिलेशनशिपचा खुलासा झाला होता.
वास्तविक असे झाले होते कि करण जोहर अनन्याला विचारतो कि विजय कोणाला डेट करत आहे ? यावर उत्तर देत अभिनेत्रीने म्हंटले होते कि “He is in rush…rush to meet meeka singh. या दरम्यान विजयने म्हंटले होते कि तुला खरंच असं वाटतंय अनन्याने बोललेल्या या शब्दामध्ये रश्मिका मंदानाचे नाव दडले आहे. अनन्याने म्हंटलेल्या rush या शब्दामध्ये रश्मिका मंदानाचे नाव जोडले गेले होते ज्यानंतर चाहते देखील उत्साहित झाले होते. तथ्पाई दोघांनी आपल्या नात्यावर मौन बाळगले आहे.
रश्मिका मंदाना साऊथ इंडस्ट्री मधील पॉपुलर अभिनेत्री आहे जिने आपल्या करियरमध्ये सरिलेरू नेक्केवरू, किरिक पार्टी, अंजनी पुत्र, चमक, चलो, गीता गोविंदम, भीष्मा, पोगारू आणि सुल्तान सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर विजय देवरकोंडा देखील काही कमी नाही.
विजय देवरकोंडा देखील साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज स्टार आहे. विजय देवरकोंडा नुकतेच लायगर चित्रपटामध्ये अनन्या पांडेसोबत दिसला होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. तर रश्मिका देखील नुकतेच गुडबाय चित्रपटामध्ये दिसली होती.
View this post on Instagram