‘श्रावणी आणि सत्याचं लग्न…’ वेड चित्रपटा बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा, २० जानेवारीपासून चित्रपटामध्ये होणार मोठे बदल…

By Viraltm Team

Published on:

अवघ्या तीन आठवड्यामध्ये वेड चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत ५० करोडचा टप्पा पार केला आहे. ५० करोडची कमाई करणारा वेड चित्रपट हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. याअगोदर सैराट चित्रपटाने ५० करोडचा आकडा पार करत १०० करोडची कमाई केली होती.

या चित्रपटाचा रेकॉर्ड बेड चित्रपट मोडीत काढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वेड चित्रपटाम्ह्द्ये श्रावणीच्या एकतर्फी प्रेमाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. श्रावणी तिच्या प्रेमाने सत्याचे मन जिंकण्यात यशस्वी होते पण चित्रपटामध्ये दोघांवर एकसुद्धा रोमँटिक गाणं पाहायला मिळाले नाही.

दर्शकांनी चित्रपटामधील हि त्रुटी निदर्शनास आणून दाखवल्यानंतर रितेश देशमुखने यावर विचार केला आणि एक घोषणा केली आहे. रितेश देशमुखने नवीन काहीतरी घेऊन येतोय अशी पोस्ट त्याने सोशल मिडियावरून शेयर केली.

आता वेड चित्रपटाला रिलीज होऊन १८ दिवस उजाडले आहेत चित्रपट देखील सुपरहिट झाला आहे. मग चित्रपटामध्ये आणखी काही नवीन पाहायला मिळणार यामुळे दर्शक उत्सुक झाले आहेत. मात्र आता येवून पडदा हटला आहे. येत्या २० जानेवरी रोजी चित्रपटामध्ये एक नवीन गाणं टाकल जाणार आहे.

या गाण्यामध्ये रितेश आणि जेनेलिया सात फेरे घेताना पाहायला मिळत आहेत. सत्या आणि श्रावणी एक होतात पण दोघांच पुढे काय होत याच उत्तर दर्शकांना या गाण्यातून मिळणार आहे. वेड चित्रपटाने नवीन गाणे एका नव्या रुपामध्ये चित्रित करण्यात आले आहे. गाण्यामधून दर्शकांना आता श्रावणी आणि सत्याची पुढची गोष्ट पाहायला मिळणार आहे. २० जानेवारीपासून चित्रपटगृहामध्ये हे गाणे पाहायला मिळणार आहे.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल करणे खूपच कमी वेळा पाहायला मिळते. त्यामुळे दर्शक देखील हा बदल स्वीकारतील अशी अशा व्यक्त केली जात आहे. रितेश आणि जेनेलियाची जोडी दर्शकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे या लाडक्या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी दर्शक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करतील यात काही शंका नाही. चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

कोरोना काळानंतर हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे ज्याने इतकी भरगोस कमाई केली आहे. सध्या रितेशचा चित्रपट सैराटला मागे टाकतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजूनहि चित्रपट क्रेज काय आहे त्यामुळे १०० करोडचा आकडा हा चित्रपट लीलया पार कारे अशा अशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment