‘या’ अभिनेत्याने केली क्रिती सेनॉनची पोलखोल, म्हणाला; साऊथच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याला डेट करतेय अभिनेत्री…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा भेड़िया चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. तथापि दोघे अजूनदेखील चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आता नुकतेच भेड़िया स्टार्स झलक दिखला जा या रियालिटी शोच्या फिनालेमध्ये पोहोचले होते. जिथे वरुणने क्रिती आणि प्रभास यांच्यातील नात्याचा खुलासा केला आहे.

अभिनेत्याने या मंचावर आदिपुरुष स्टार्स क्रिती सेनॉन आणि प्रभासच्या अफेयरच्या चर्चांवर खुलासा केला, ज्यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे कि खरोखरच ते एकमेकांना डेट करत आहेत. वरुणने नाव न घेता हे संकेत दिले कि क्रिती ‘बाहुबली’ स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

वरुण धवन आणि क्रिती सेनॉन रविवारी रात्री डांस रियालिटी शो झलक दिखला जाच्या फिनालेमध्ये आपल्या नुकतेच रिलीज झालेल्या भेड़िया चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते. शोमध्ये जज आणि चित्रपट निर्माता करणं जोहरने वरुणला बॉलीवूडच्या काही सिंगल एलिजिबल लेडीजची नावे सांगण्यास सांगितले. यावर वरुणने जी लिस्ट दिली त्यामध्ये क्रितीचे नाव नव्हते.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरुणला करण विचारतो कि क्रितीचे नाव लिस्टमध्ये का नाही. यावर वरुण उत्तर देत म्हणतो कि क्रितीचे नाव यामुळे नाही कारण तिचे नाव कोणाच्यातरी हृदयामध्ये आहे. एक व्यक्ती आहे जो मुंबईमध्ये नाही, तो यावेळी तो दीपिका (पादुकोण) सोबत शुटींग करत आहे.

वरुण असे म्हणताच क्रिती चेहऱ्यावर हसू येते आणि ती आपले दोन्ही हात वर करते, तिथे असलेले इतर लोक जोरजोराने हसू लागतात. तथापि वरुणने प्रभास नाव घेतलेले नाही पण चाहते याला एक घोषणा म्हणून पाहत आहेत. प्रभास दीपिकासोबत प्रोजेक्ट के वर काम करत आहे, जो एक द्विभाषी चित्रपट आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन देखल आहे.

Leave a Comment