वरून धवनच्या चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’, धवन कुटुंबामध्ये हल्ला पाळणा, वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी दिली गोड बातमी…

By Viraltm Team

Published on:

धवन कुटुंबाच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. वरुण धवन पुन्हा एकदा काका बनला आहे. अशामध्ये त्याला शुभेच्छा देणे तर बनतेच. चित्रपट दिग्दर्शक रोहित धवन आणि त्याची पत्नी जान्हवी धवन दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. वरुण धवनची वाहिनी जान्हवी धवनने गोड मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती वीरेंद्र चावला या इंस्टाग्राम पेजवरून शेयर करण्यात आली आहे.

चित्रपट दिग्दर्शक रोहित धवन डेविड धवनचा मोठा मुलगा आणि वरुण धवनचा मोठा भाऊ आहे. नुकतेच इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे, ज्यामध्ये रोहित ब्लू शर्टमध्ये हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये रोहित एकटाच नव्हता तर त्याच्यासोबत त्याचे वडील डेविड धवन देखील होते. रोहितला पाहताच पापाराझींनीही त्याला मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

तथापि रोहित तिथे जास्त वेळ थांबला नाही आणि आपल्या वडिलांसोबत कारमध्ये बसून निघून गेला. आता रोहित आणि जान्हवी पुन्हा एकदा आईवडील झाले आहेत यापेक्षा आनंदाची मोठी बातमी काय असू शकते. मार्चमध्ये वरुण धवनची पत्नी आणि जान्हवीची जाऊ नताशा दलालने आपल्या मोठ्या जाऊसाठी बेबी शॉवर देखील ठेवले होते. या पार्टीमध्ये अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूरदेखील सामील झाली होती.

रोहित धवन आणि जान्हवी धवनने ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फेब्रुवारी २०१२ मध्ये गोव्यामध्ये लग्न करून आपल्या लाईफमधील नवीन अध्याय सुरु केला होता. दोघांच्या लग्नामध्ये रणबीर कपूर, अमीषा पटेल, ऋषि कपूर, सोनम कपूर, गोविंदा आणि इतर अनेक सेलेब्स सामील झाले होते. २०१८ मध्ये जाह्नवी-रोहितला पहिले मुल झाले होते आणि २०२२ मध्ये ते आता दुसऱ्या मुलाची जबाबदारी उचलण्यासाठी तयार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

Leave a Comment