स्ट्रेच मार्क्सवरून ट्रोल करणाऱ्यांना ४३ वर्षाच्या अभिनेत्रीने दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाली; ‘दोन मुलांचा बाप…’

By Viraltm Team

Published on:

उर्वशी ढोलकिया अशा निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकता कपूतच्या कसौटी जिंदगी की टीव्ही शोमध्ये कमोलिकाची भूमिका करून उर्वशीने घराघरामध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. आता अभिनेत्री ४३ वर्षाची आहे आणि तिला दोन मोठी मुले आहेत. तर सध्या उर्वशी आपल्या टोन्ड बॉडीमुळे सोशल मिडियावर चर्चेमध्ये आहे. ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. आता अभिनेत्रीने त्या ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

उर्वशी ढोलकिया सोशल मीडिया खूपच सक्रीय असते. जिथे ती आपल्या लाईफ संबंधी अनेक क्षणांना चाहत्यांसोबत शेयर करते. नुकतेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आपले काही बिकिनी फोटो शेयर केले आहेत जे पाहता पाहता व्हायरल झाले आहेत. तर फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये परफेक्ट बॉडीबद्दल इमोशनल नोट देखील लिहिले आहे. आपल्या पोस्टमध्ये उर्वशीने महिलांना सल्ला दिला आहे कि तिने त्यांनी आपल्या बॉडीबद्दल कंफर्टेबल असायला हवे.

नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उर्वशी ढोलकियाने म्हंटले कि, लुक्सबद्दल महिलांना नेहमीच जज केले जाते, ज्यामुळे त्या प्रेशरमध्ये राहतात. अभिनेत्री पुढे म्हणाली कि मी जी पोस्ट लिहिले आहे ती सेंसिटिव टॉपिक आहे. माझी इच्छा नाही कि लोकांना मला पुन्हा एकदा जज करावे, नाहीतर माझ्या पोस्टचा अर्थ निघून जाईल. अभिनेत्रीने खुलासा केला कि नेहमी तिला तरुण मुलांची आई म्हणून कॅटेगराइज केले गेले. उर्वशीने यावर म्हंटले कि मी जेव्हा देखील काही पोस्ट करते किंवा कोणते काम करते तेव्हा लोक मला दोन मुलांच्या आईच्या रूपामध्ये कॅटेगराइज करतात. मी आधी एक व्यक्ती आहे आणि नंतर आई आहे. कोणी कोणाला हे म्हणू शकत नाही कि तो दोन मुलांचा बाप आहे.

उर्वशी ढोलकिया पुढे म्हणाली कि आज देखील आपल्या देशामध्ये लोक हा विचार करतात कि महिलांना वयाच्या चाळीशीनंत्र्रआपल्या मर्जीने जगण्याच्या अधिकार नाही. मला पोस्टर हे लिहून फिरावे लागेल का कि मी दोन मुलांची आई आहे ? लोक हे सांगण्याचा प्रयत्न करतात कि माझ्या रिटायरमेंटची वेळ आली आहे. दुसरीकडे लोक बिकिनीमध्ये महिलांना पाहण्यासाठी थिएटर्समध्ये जातात मग सोशल मिडियावर असे फोटो पाहिल्यानंतर कमेंट करू लागतात कि तिची मुले लग्नाला आली आहेत आणि हि बिकिनीमध्ये पोज देत आहे.

माझ्या मुलांचे लग्न कधी होईल हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? जर मी सूट घालून पूलमध्ये गेली तरीही लोक कमेंट करतील. जेव्हा एक पुरुष शर्ट काढतो तेव्हा कोणी काहीच म्हणत नाही. मला कोणाच्या परमिशनची गरज नाही कारण वाईट काळामध्ये माझ्यासोबत लोक उभे राहू शकत नाहीत, माझे बिल भरत नाहीत, मी तेच करेन जे मला करायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI (@urvashidholakia)

Leave a Comment