भूतकाळात भारतासाठी अभिमानाचा दिवस होता, जेव्हा भारतातील चंदीगड येथील हरनाझ संधूने मिस युनिव्हर्स २०२१ चे विजेतेपद जिंकले होते. एकीकडे हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता तर दुसरीकडे भारताची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने याच मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये जजची भूमिका पार पाडली होती. मिस यूनिवर्स स्पर्धेचा ७० वा आयोजन सोहळा नुकतेच १३ डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

जिथे हरनाज संधूने ८० देशामधील स्पर्धकांना हरवून मिस यूनिवर्सचा किताब आपल्या नावावर केला होता. मिस यूनिवर्सचा किताब भारताला २१ वर्षानंतर मिळाला आहे. जेव्हा हरनाजच्या नावाची घोषणा मिस यूनिवर्स २०२१ साठी करण्यात येत होती तेव्हा बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील उपस्थित होती. ती मिस यूनिवर्स २०२१ ची सर्वात कमी वयाची जज होती. या दरम्यान अभिनेत्रीने सोशल मिडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ देखील शेयर केले.

फक्त २७ व्या वयामध्ये उर्वशी रौतेलाला मिस यूनिवर्स २०२१ पेजेंटला जज करताना पाहिले गेले होते आणि यादरम्यान तिने जज म्हणून उत्कृष्ट काम केले. त्याचबरोबर हा देखील खुलासा झाला कि उर्वशीला मिस यूनिवर्स २०२१ ची जज म्हणून किती मानधन मिळाले आहे.

माहितीनुसार मिस यूनिवर्स २०२१ ची जज बनण्यासाठी तिला १.२ मिलियन डॉलर मानधन देण्यात आले. हि रक्कम भारतीय चलनानुसार ८ करोड रुपये आहे. सुष्मिता सेन भारताची पहिली मिस यूनिवर्स बनली होती. तिने १९९४ रोजी हा किताब मिळवला होता. हाच कारनामा अभिनेत्री लारा दत्ताने भारतासाठी केला आहे.

हरनाज संधू भारताची तिसरी मिस यूनिवर्स बनली आहे. उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर उर्वशी लवकरच तमिळ चित्रपटामध्ये डेब्यू कणार आहे. उर्वशी एक माइक्रोबायोलॉजिस्ट आणि एक आईआईटीयन भूमिकेमध्ये दिसणार आहे. उर्वशीचा इंस्पेक्टर अविनाश हा अपकमिंग चित्रपट देखील येणार आहे. यामध्ये ती रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. चित्रपटापेक्षा उर्वशी वादामुळे जास्त चर्चेमध्ये राहते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.