२ बायका आणि ४ मुले असलेल्या गायकाने ‘या’ अभिनेत्रीला दिली लग्नाची ऑफर, अभिनेत्री म्हणाली; मला लग्नाआधीच…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या सौंदर्यासाठी आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. उर्वशीच्या चाहत्यांची तिच्याप्रती क्रेज पाहण्यासारखी आहे. आता अभिनेत्रीने आपल्या एका नवीन मुलाखतीदरम्यान एक खुलासा केला आहे. ती म्हणाली कि मला अनेक लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. यादरम्यान तिने एका प्रस्तावाबद्दल देखील सांगितले.

उर्वशी रौतेलाला जेव्हा मुलाखतीदरम्यान विचारले कि तिला कधी विचित्र प्रस्ताव आला आहे का ? यावर उत्तर देताना ती म्हणाली कि मिस्रच्या एका सिंगरने मला प्रपोज केले होते. उर्वशी म्हणाली कि तिला कल्चरल डिफ्रेंसमुळे गायकाला नकार द्यावा लागला. उर्वशीने सांगितले कि गायक आधीच विवाहित होता आणि त्याला दोन बायका आणि चार मुले आहेत.

मुलाखतीदरम्यान उर्वशी म्हणाली कि मी अनेक प्रपोजल्सवर डील केल्या आहेत. पण एक प्रस्ताव अशा व्यक्तीकडून मिळाला होता. त्याच्यामध्ये आणि माझ्यात खूपच जास्त कल्चरल डिफ्रेंस होता. एका व्यक्तीला आपल्या कुटुंबाबद्दल देखील विचार करावा लागतो. खासकरून महिलांना याबद्दल जास्त विचार करावा लागतो, कारण हे तितके सोपे नसते.

मुलाखतीमध्ये उर्वशीला विचारले गेले कि तो गायक मिस्रचा आहे का, ज्याला ती दुबईमध्ये भेटली होती. यावर उर्वशी म्हणाली कि होय, पण त्या व्यक्तीला आधीच दोन बायका आणि चार मुले आहेत. पण असा कोणताही निर्णय घेणार नाही, ज्यामुळे मला दूर जावून राहावे लागेल, किंवा त्याला इथे येऊन राहावे लागेल.

उर्वशीने गायकाच्या नावाचा खुलासा केला नाही. पण एका चाहत्याने तिच्या मुलाखतीच्या व्हिडीओवर कमेंट करून त्याचे नाव लिहिले आहे. वास्तविक उर्वशीने मिस्रचा अभिनेता आणि गायक मोहम्मद रमादानसोबत व्हर्सास बेबी म्युझिक व्हिडीओ मधून आपला इंटरनॅशनल डेब्यू केला होता. व्हिडीओ २०२१ मध्ये रिलीज झाला होता.

Leave a Comment