अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत उर्मिला मातोंडकरचे खास कनेक्शन आहे. याचे श्रेय उर्मिला दिवंगत अभिनेत्री आणि जान्हवीची आई श्रीदेवीला देते. हि गोष्ट उर्मिला डांस रियलिटी शो ‘डांस इंडिया डांस सुपर मॉम्सच्या मंचावर सांगताना पाहायला मिळाली. या रियालिटीसोबतमध्ये जान्हवी कपूर एक गेस्ट म्हणून पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये उर्मिला जज म्हणून काम करत आहे. आगामी शोमध्ये उर्मिला काही जुन्या आठवणी शेयर करताना दिसेल.

उर्मिला मातोंडकर आणि श्रीदेवीने जुदाई चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान श्रीदेवी प्रेग्नंट होती. उर्मिला मातोंडकरने सांगितले कि सेटवर येण्यापूर्वी जेव्हा ती जान्हवी कपूरला भेटली तेव्हा तिला जुदाई चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवीसोबत घालवलेले क्षण आठवले. तिने जान्हवीसोबत त्या आठवणी शेयर केल्या.

डीआईडी सुपर मॉम्सची एक सहभागी सादिका खानने एका प्रेग्नंट महिलेची भूमिका केली. तिचा परफॉर्मेंस पाहून उर्मिलाला जुदाईची को-स्टार श्रीदेवीची आठवण आली. उर्मिलाने म्हंटले कि सादिका तुला मी एक गोष्ट सांगू इच्छिते कि तू प्रेग्नंसीची जर्नी खूपच सुंदरपणे दाखवली आहेस. पण या अॅक्टमध्ये खरी हिरो तुझी मुलगी मायरा आहे. मला वाटते कि ती असल्यामुळे हे एक कंप्लीट अॅक्ट बनले. खरेतर हि ती गोष्ट आहे जी मी आत्ता जान्हवीला सांगत होते जेव्हा ती मला सेटच्या बाहेर भेटली.

उर्मिला मातोंडकर पुढे म्हणाली कि जुदाई चित्रपटामधील एका गाण्याची शुटींग सुरु होती आणि त्यावेळी श्रीदेवी प्रेग्नंट होती. तेव्हा जान्हवीचा जन्म झाला होणार होता. श्रीदेवी प्रमाणे तुम्ही देखील मुलीसोबत डांस केला आहे. मी प्रार्थना करते कि तुमचे आयुष्य सुखांनी भरून जावे.

जुदाई चित्रपट १९९७ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये अनिल कपूर, श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर, कादर खान, फरीदा जलाल, जॉनी लीवर, परेश रावल आणि सईद जाफरी या कलाकारांनी काम केले होते. चित्रपटामध्ये उर्मिलाच्या भूमिकेचे नाव जान्हवी होते, ज्यामुळे नंतर श्रीदेवी आणि बोनी कपूरने आपल्या मुलीचे नाव जान्हवी ठेवले.