Tutorials Point

अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या बिंदासपणामुळे नेहमी चर्चेमध्ये असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्यासोबत झालेल्या गैरकृत्यावर मोठी अॅक्शन घेतली आहे. अनेक मुली तिच्यापासून धडा घेत आहेत. वास्तविक उर्फीने आपल्यासोबत झालेल्या गैरकृत्याबद्दल आणि घाणेरडी मागणी करण्याऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. उर्फीला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे

सोशल मिडिया पोस्टमध्ये मुंबई पोलिसांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर आज उर्फी त्यांचे आभार मानताना पाहायला मिळाली. वास्तविक काही मिनिटांपूर्वी उर्फी जावेदने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट स्टोरीमध्ये ओबेदचा फोटो शेयर करताना मुंबई पोलिसांचे आभार मानले कारण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उर्फीने लिहिले कि, गुड न्यूज माझ्यासोबत छेड़छाड़ करनारा व्यक्ती अखेर तुरुंगात आहे मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार. ओबेदच्या अटकेनंतर अभिनेत्रीने आता सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.

वास्तविक काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली होती. त्या पोस्टद्वारे उर्फीने एका व्यक्ती विरुद्ध तक्रार केली होती जो तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. उर्फीने त्या व्यक्तीसोबत झालेल्या आपल्या चॅटचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले होते ज्यामध्ये तो अभिनेत्रीसोबत व्हिडीओ वर से क्स करण्याची मागणी करत होता आणि अभिनेत्री असे करण्यासाठी अजिबात सहमत नव्हती.

२४ वर्षाच्या उर्फी जावेदने रविवारी आपल्या सोशल मिडिया हँडलवर ओबोद आफ्रिदी नावाच्या व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. ओबेदच्या फोटोसोबत उर्फीने काही व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते आणि आरोप केला होता कि हा व्यक्ती तिला ब्लॅकमेल करण्यासोबत तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवण्याची मागणी देखील करत आहे. उर्फीने असा उल्लेख केला होता कि हा पंजाब इंडस्ट्रीशी संबंधीत व्यक्ती आहे.

इतकेच नाही उर्फीने आपल्या पोस्टमध्ये पोलिसांच्या निष्काळजीपणाचे स्पष्टीकरण देत लिहिले होते की, मी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती पण १४ दिवसांनंतर देखील कोणतीच कारवाई केली गेली नाही. मी खूपच निराश आहे. मी मुंबई पोलिसांबद्दल अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत, पण या व्याक्तीप्रती त्यांची वागणूक विचित्र आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.