बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली अभिनेत्री आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाला कोण नाही ओळखत. ट्विंकल खन्ना सध्या चित्रपटांपासून दूर आहे आणि ती पुस्तक लिहिण्याचे काम करते. याशिवाय ट्विंकल खन्ना नेहमी आपल्या बेधडक वक्तव्य करण्यासाठी देखील ओळखली जाते. अनेकवेळा तिला आपल्या वक्तव्यांमुळे टिकेचा सामना करावा लागला आहे. राजेश खन्ना सारख्या सुपरस्टार मुलगी असून देखील ट्विंकल खन्नाला बॉलीवूडमध्ये खूपच कमी काम मिळाले. एका मुलाखतीमध्ये ट्विंकल खन्नाने सांगितले होते कि तिची मुले तिच्या चित्रपटांबद्दल काय विचार करतात.
ट्विंकल खन्नाने १९९५ मध्ये रिलीज झालेल्या बरसात चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत बॉबी देओल मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. यानंतर ट्विंकल खन्नाने मेला, इतिहास, जान, जब प्यार किसी से होता ही आणि बादशाह चित्रपटामध्ये काम केले होते. पण ती अचानक फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. यानंतर तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केले. अक्षयसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकल दोन मुलांची आई बनली. तिच्या मुलीचे नाव नितारा आणि मुलाचे नाव आरव आहे.
ट्विंकल म्हणाली कि मी माझ्या मुलांना माझे चित्रपट पाहू देत नाही. जान चित्रपटाचा एक सीन होता जो माझा मुलगा पुन्हा पुन्हा पाहत होते. तो क्लिप पुन्हा पुन्हा बघत होता, ज्यामध्ये मी व्यक्तीच्या छातीवर कीस करत होते आणि त्याने माझ्या वाढदिवशी याचा एक कोलाज बनवला होता.
अभिनेत्री पुढे म्हणाली कि मला नाही वाटत कि या महान करियरबदल माझ्या कुटुंबांचा खूप सपोर्टिव रोल राहिला आहे. नोकरी आणि करियरमध्ये फरक असतो. मला यामध्ये मजा आली नाही. मला फक्त हे करायचे होते कि घरी जावे आणि फक्त पुस्तके वाचावी. अनेकवेळा मी सेटवर बसून विणकाम करायचे आणि माझा स्पॉट बॉय मला म्हणायचा कि तुम्ही हे करू नका तुम्हाला सगळे आंटी म्हणतील.
ट्विंकल आणि अजय देवगनची जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. हेच कारण ह्तोये कि तिने इतिहास नंतर जान चित्रपटामध्ये काम केले होते. १९९६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ट्विंकलने २००१ मध्ये रिलीज झालेल्या लव के लिए कुछ भी करेगा चित्रपटामध्ये शेवटचे काम केले होते.