अचानक समोर आली ‘मृत’ टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर, पाहून सर्वजण झाले आश्चर्यचकित म्हणाली; मुलाने मला नाही मारले…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही इंडस्ट्री मधून काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री विना कपूरची तिच्या मुलाने ह त्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. प्रॉपर्टीसाठी अभिनेत्रीच्या मुलाने असे पाऊल उचलल्याचं सांगितले जात होते. पण आता मृत अभिनेत्री वीणा कपूरने मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपण जिवंत असल्याचा दावा केला आहे.

हे प्रकरण जरा विचित्रच वाटत असेल कि एक मृत महिला तक्रार कशी करू शकते. पण हे सत्य आहे. वास्तविक झाले असे कि ह त्या टीव्ही अभिनेत्री वीणा कपूरची झाली नाही तर मुंबईच्या जुहू भागामध्ये एका महिलेची झाली होती जिचे नाव देखील वीणा कपूर होते. जिला तिचा मुलगा सचिन कपूरने मारले होते.

दोघांचे नाव एकसारखे असल्यामुळे लोकांमध्ये मोठे कन्फ्यूजन झाले आणि ते अभिनेत्री वीणा कपूरलाच मृत समजू लागले. अशामध्ये सोशल मिडियावर अभिनेत्रीला लोक श्रद्धांजलि देऊ लागले. इतकेच नाही तर तिच्या मुलाला देखील खूप ट्रोल केले गेले. आता अभिनेत्री वीणा कपूरने पोलिसात अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अभिनेत्री वीणा कपूरने पोलिसात तक्रार दाखल करत म्हंटले कि ती जिवंत आहे आणि सोशल मिडियावर तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली जात आहे. अभिनेत्रीने म्हंटले कि लोक सोशल मिडियावर श्रद्धांजलि देण्यासोबत तिच्या मुलाला देखील अपमानित करत आहेत, ज्यामुळे ती दुखावली आहे. अभिनेत्री आपल्या निधनाच्या अफवांमुळे त्रासली आहे, ज्यानंतर तिने पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला.

अभिनेत्रीने म्हंटले कि मी अस्वस्थ झाली आहे. माझे फोटो व्हायरल होत आहेत आणि लोक मला श्रद्धांजलि देत आहेत. मला लोकांचे फोन येत आहेत आणि मी माझ्या कामावर लक्ष देऊ शकत नाही आहे. मी सर्वांना सांगू इच्छिते कि माझ्या मुलाने माझी ह त्या केलेली नाही. अशा खोट्या अफवांमुळे मला काम मिळणे बंद झाले आहे. विशेष म्हणजे ज्या महिलेची ह त्या झाली तिचे नाव देखील वीणा कपूर आहे.

Leave a Comment