कॉफी विथ करण एक असा चॅट शो आहे ज्यामध्ये होस्ट करण जौहर प्रत्येकवेळी गेस्टकडून गॉसिप आणि त्यांच्या पर्सनल लाइफचे सीक्रेट्स काढून घेतो. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये टाइगर श्रॉफ कृति सेनन सोबत दिसणार आहे. यावेळी देखील एपिसोडमध्ये अनेक मसालेदार गोष्टी केल्या गेल्या. एपिसोडच्या दरम्यान टाइगर सांगितले कि तो कोणत्या अभिनेत्रीकडे जास्त आकर्षित होतो आणि कोणाला डेट करायचे आहे.
कॉफी विथ करणचा नवीन एपिसोड लवकरच रिलीज होणार आहे. ज्यामध्ये कृति सेनन आणि टाइगर श्रॉफ पाहायला मिळणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो स्वतः करणने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे. प्रोमोमध्ये लाजाळू टायगरने आपल्या डेटिंग लाइफसंबंधी अनेक खुलासे केले आणि कृतिची देखील पोलखोल केली.
अनेक वर्षांपासून टायगर श्रॉफ दिशा पटानी एकमेकांना डेट करत होते आणि आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. एपिसोडमध्ये टायगरने सांगितले कि त्याला कोणत्या अभिनेत्रीला डेट करायचे आहे आणि कोणाकडे तो जास्त आकर्षित होतो. त्याने एपिसोडमध्ये सांगितले कि त्याला अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करायचे आहे आणि तिच्याकडे तो जास्त आकर्षित होतो.
प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता कि टायगर करण विचारत आहे कि जेव्हा त्याने २०१४ मध्ये पहिल्यांदा कृतिसोबत चित्रपट केला होता तेव्हा त्याने कृतिकडे पाऊल का टाकले नाही आणि तिला डेट का केले नाही यावर टायगर म्हणाला कि त्यावेळी कृति टेकन होती म्हणजे कोणाला तरी डेट करत होती. यावर कृति देखी हैराण झाली.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.