हस्तरेखाशास्त्रानुसार हातावर असलेल्या रेषांच्या मदतीने आपण भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळातील सर्व माहिती आपण सहज मिळवू शकतो. या रेषांच्या मदतीने आपण आपल्या आर्थिक स्थितीची माहिती देखील मिळवू शकतो. हातावर असणाऱ्या रेषांची काही अशी स्थिती असते जी आपल्या आर्थिक स्थितीबद्दल अनेक रहस्य उजागर करते. आज आम्ही तुम्हाला हातावरील रेषांच्या अशा स्थितीबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या एखाद्या व्यक्तीच्या हातावर असतील तर त्याच्याजवळ पैसा कधीही टिकत नाही.

हस्तरेखाशास्त्रानुसार जर भाग्य रेषा आणि जीवन रेषा नेहमी एकत्र असतात. मंगळ पर्वतावर अनेक रेषा असतील आणि जीवन रेषा सरळ असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधील धनाची स्थिती चांगली नसते. जर एखाद्या व्यक्तीची भाग्य रेषा हि चंद्र पर्वतावरुन सुरु होऊन शनी पर्वतापर्यंत जात असेल तर त्याचा असा आशय आहे कि, त्या व्यक्तीला छोट्या छोट्या कामांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याची गरज असते.जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषा मस्तिष्क रेषेवर थांबली असे आणि दोन्हींचा जोड लांब असेल त्याचबरोबर मंगळ रेषेवर अनेक रेषा येऊन मिळत असतील तर ती स्थिती खूप शुभ असते. कारण अशी स्थिती लक्ष्मीचे आगमन मानली जाते. परंतु अशा स्थितीमध्ये जातकाच्यासोबत अशी परिस्थिती बनते ज्यामध्ये त्याचा अवास्तव खर्च होत जातो आणि त्याच्या संपत्तीमधील सर्व धन संपून जाते.

जर एखाद्या व्यक्तीच्या मनिबंधातून निघून भाग्य रेषा मधल्या बोटाच्या तिसऱ्या पर्वतापर्यंत पोहोचत असेल तर हि स्थिती खूपच अशुभ मानली जाते. कारण अशी स्थिती एकामागून एक येणाऱ्या समस्यांचे संकेत असते.हस्तरेखाशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातामध्ये शुक्र पर्वतावरुन निघून कोणतीही रेषा मंगळ पर्वतावर जात असेल, तर अशा व्यक्तीच्या जवळ दीर्घकाळ संपत्ती टिकत नाही. याशिवाय शुक्र पर्वतावर क्रॉसचे चिन्हदेखील पैशाची बचत करण्यात अपयश दर्शवते.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.