फिल्मी जगतामध्ये रिलेशन तुटणे आणि जुळणे एक सामान्य बाब आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लोकप्रियता मिळवल्यानंतर आपले पाहिले प्रेम सोडून दिले. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपले पहिले प्रेम सोडून दिले.
सुशांत सिंह राजपूत: काय पो छे, केदारनाथ सारख्या मोठ मोठ्या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता सुषण सिंह राजपूत आता या जगामध्ये नाही. तुम्हाला सर्वांना तर माहिती असेलच टेलीविजन इंडस्ट्रीमध्ये नाव कमवल्यानंतर त्याने बॉलीवूडमध्ये अमाप लोकप्रियता मिळवली. सुशांत पहिला अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत रिलेशनमध्ये होता आणि अनेक वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्याने अंकिताला सोडून दिले.
रणबीर कपूर: रणबीर कपूरला बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये लव्हर बॉय म्हणून ओळखले जाते कारण तो अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनमध्ये राहिला आहे. रणबीर कपूरचे पहिले प्रेम अवंतिका मलिक होते. दोघांनी एकत्र अनेक वेळा वेळ घालवला होता, पण रणबीर कपूरने तिला सोडून कॅटरीना कैफचा हात हातामध्ये घेतला. तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
अनुष्का शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे, पण रणवीर सिंह आणि विराट कोहलीच्या अगोदर देखील अनुष्का शर्माचे दुसऱ्यासोबत रिलेशन राहिले आहे. फिल्मी जगतामध्ये स्ट्रगलिंग दरम्यान अनुष्का शर्माची भेट जोहेब यूसुफ सोबत झाली होती. दोघांनी अनेक वर्षे एकत्र टाईम स्पेंड केला. जेव्हा अनुष्काला बॉलीवूडमध्ये सफलता मिळाली तेव्हा तिने आपल्या पहिल्या प्रेमाला सोडून दिले. नंतर तिचे नाव रणवीर सिंहसोबत जोडले गेले त्यानंतर तिने विराट कोहलीसोबत लग्न केले.
दीपिका पादुकोण: हॉलीवुड आणि बॉलीवुडमध्ये सफल होणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आज जगामध्ये प्रसिद्ध आहे. दीपिका बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त रिलेशनमध्ये राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती ७ लोकांसोबत रिलेशनमध्ये राहिली आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर, सिद्धार्थ माल्या, युवराज सिंह सारखी मोठमोठी नावे सामील आहेत. दीपिकाने आपल्या करियरच्या सुरुवातीला निहार पंड्याला डेट केले होते. त्या दरम्यान दीपिका स्ट्रगल करत होती. दोघांची भेट अॅक्टिंग स्कूलमध्ये झाली होती, पण जेव्हा दीपिका बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा ती आपल्या पहिल्या प्रेमाला विसरून गेली.