बॉलीवूडमध्ये काही काय होईल हे कोणालाच माहिती नसते. बॉलीवूडमध्ये नेहमी अभिनेता आपल्यापेक्षा कमी वयाच्या हिरोईनसोबत रोमांस करताना पाहायला मिळतात. अनेकवेळा असे देखील होते कि जेव्हा एखादा अभिनेता आपल्यापेक्षा कमी वयाने खूप मोठ्या अभिनेत्रीसोबत रोमांस करताना पाहायला मिळतो किंवा अभिनेत्री आपल्यापेक्षा छोट्या वयाच्या अभिनेत्यासोबत रोमांस करताना दिसते.
बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये असे पाहायला मिळाले कि अनेक अभिनेत्री चित्रपटांमध्ये स्वतःपेक्षा अनेक वर्षाने लहान अभिनेत्यासोबत बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली. आज आपल्या या लेखामधून हिंदी चित्रपटामधील अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
रेखा आणि अक्षय कुमार: सदाबहार अभिनेत्री रेखा आणि सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या वयामध्ये १३ वर्षाचे अंतर आहे. रेखा अक्षयपेक्षा १३ वर्षाने मोठी आहे. दोघांनी १९९६ मध्ये आलेल्या खिलाड़ियों के खिलाड़ी चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. दोघांमध्ये यादरम्यान जबरदस्त बोल्ड सीन पाहायला मिळाले होते. या जोडीने तेव्हा खूपच खळबळ उडवून दिली होती.
दीपा साही आणि शाहरुख खान: दीपा साही आणि शाहरुख खान देखील मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसले आहेत. माया मेमसाहब चित्रपटामध्ये दीपा साहीने स्वतःपेक्षा लहान शाहरुख खानसोबत बोल्ड सीन दिले होते. दीपा साही शाहरुख खानपेक्षा तीन वर्षाने मोठी आहे.
डिंपल कपाड़िया आणि अक्षय खन्ना: डिंपल कपाड़िया आणि अक्षय खन्नाने दिल चाहता है चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटामध्ये हि जोडी रोमांस करताना देखील दिसली होती. डिंपल ६५ वर्षाची आहे तर अक्षय खांना ४७ वर्षाचा आहे. दोन्ही कलाकारांमध्ये १८ वर्षाचे अंतर आहे.
तब्बू आणि ईशान खट्टर: हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने तर सर्व हद पार केल्या होत्या. नुकतेच तब्बूने अभिनेता ईशान खट्टरसोबत अ स्वीटेबल बॉय चित्रपटामध्ये जबरदस्त रोमांस केला होता. चित्रपटामध्ये दोघांमध्ये खूपच इंटीमेट सीन पाहायला मिळाले होते. तर दोघांनी एकमेकांना कीस देखील केले होते. ईशान फक्त २७ वर्षाचा आहे तर तब्बूचे वय ५१ वर्षे आहे.
डिंपल कपाड़िया: अभिनेत्री डिंपल कपाड़िया कपाडियाचे या लिस्टमध्ये पुन्हा एकदा सामील होते. तिने २००२ मध्ये आलेल्या लीला चित्रपटामध्ये स्वतःपेक्षा लहान वयाच्या मुलासोबत रोमांस केला होता. एका प्रोफेसरच्या भूमिकेमध्ये दिसलेल्या डिंपलच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.