बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करुन पुन्हा लग्न करण्याची प्रथा तशी जुनीच आहे. बऱ्याच कलाकारांनी एकापेक्षा जास्त लग्न केली आहेत. परंतु बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक विवाह केले आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत.

श्वेता तिवारी: श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात महागडी आणि एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फेमस टीव्ही स्टार राजा चौधरी यांच्यासोबत लग्नानंतर तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा ही शेवटी घटस्फोट झाला. मात्र नंतर ती टीव्ही अभिनेता अभिनव कोहलीच्या प्रेमात पडली आणि २०१३ मध्ये त्यांनी लग्न केले. श्वेता एक कणखर अभिनेत्री होती जिने १४ वर्ष छळ सहन करून सुद्धा पुन्हा लग्न करण्याची हिम्मत दाखवली.डिंपी गांगुली: ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ हा स्वयंबर रियलिटी शो जिंकल्यानंतर डिंपी गांगुलीचे लग्न झाले. २०१० मध्ये त्यांनी प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजनशी लग्न केले. दुर्दैवाने, डिंपी घरगुती हिंसाचाराची बळी ठरली आणि २०१५ मध्ये तिने हे सं-बंध संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा शेवटी घटस्फो-ट झाला. त्यानंतर तिने तिचा शाळेतील सर्वांत जुना मित्र रोहित रॉयशी लग्न केले आणि आज ती अगदी आनंदाने आपले जीवन जगत आहे. या जोडप्याला आज एक मुलगीही आहे.अर्चना पूरन सिंग: ‘कॉमेडी सर्कस’ मध्ये अगदी खळखळून हसणारी अर्चना पूरन सिंग आपला दुसरा पती ‘परमीत सेठी’ याला भेटण्यापूर्वी जीवनातल्या एका कठीण काळातून जात होती. पहिले लग्न अयशस्वी झाल्यानंतर तिचा प्रेमावरचा आणि लग्नावरचा विश्वास उडाला होता आणि पुन्हा तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण अर्चनाच्या आयुष्यात परमीत आल्यापासून अर्चना पूर्णपणे बदलली होती. पाच वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अर्चना आणि परमितचे लग्न झाले आणि आज ती दोन मुलांची आई झाली आहे.दीप्शिका नागपाल: दीप्शिकाने जीत अपेंद्रशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले सुद्धा झाली होती पण १० वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि काही काळानंतर तिने जानेवारी २०१२ मध्ये इंदौरचा केशव अरोराशी लग्न केले.नीलम कोठारी: 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीने लंडनच्या एका व्यावसायिकाशी पहिले लग्न केले होते. पण या दोघांनी काही वर्षानंतर घटस्फोट घेतला आणि नंतर नीलमने अभिनेता समीरशी लग्न केले.किरण खेर: किरण खेरने व्यावसायिक गौतमशी लग्न केले होते. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही दोघांनीहि परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर किरणचे अनुपम खेरशी दुसरे लग्न झाले.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.