देवीला घेऊन घरी पोहोचले बिपाशा-करण, व्हिडीओमध्ये दिसली मुलीची पहिली झलक…

By Viraltm Team

Published on:

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या घरी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एक लहान परी जन्माला आली आणि त्याच्या सहा दिवसांनंतर म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी देखील एक लक्ष्मी आली. बिपाशा आणि करणने आपल्या मुलीच्या येण्याची घोषणा एका अतिशय गोंडस फोटोने केली ज्यामध्ये त्यांनी आपल्या हातानी आपल्या मुलीच्या पायाला पकडले होते.

फोटोसोबत अभिनेत्याने आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा देखील केला आहे. देवी बसु सिंह ग्रोवर. आता बिपाशा हॉस्पीटलमधून घरी आली आहे आणि तिने आणि करणने आपली मुलगी देवीची पहिली झलक एका व्हिडीओमध्ये दाखवली आहे.

बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर काही वेळापूर्वी त्यांची मुलगी देवीला घेऊन घरी परतले आहेत. १२ नोव्हेंबरला बिपाशाची डिलिव्हरी झाली होती आणि १५ नोव्हेंबर म्हणजे आज तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आपल्या ऑडी Q7 मध्ये बिपाशा आणि करण त्यांच्या मुलीसह घरी आले आहेत.

पॅप्सच्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि करण आणि बिपाशा गाडीमधून उतरत आहेत आणि कॅमेऱ्यासमोर पोज देखील करत आहेत. गुलाबी रंगाच्या बेबी रॅपरमध्ये देवीला रॅप केलेले आहे आणि तिची आई बिपाशा बसूच्या कडेवर आहे. काही सेकंदासाठी पोज करून बिपाशा आणि करण आपल्या मुलीला घेऊन घरामध्ये निघून जातात.

करण आणि बिपाशाने तसे तर कॅमेऱ्यासमोर पोज केली आहे, आलिया आणि रणबीरने प्रायव्हसी निवडली होती आणि आजपर्यंत ते आपल्या मुलीबद्दल मीडियासमोर आलेले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chipku Media (@chipkumedia)

Leave a Comment