फेमस मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकतेच आपल्यासोबत घडलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल वक्तव्य केले आहे. जे ऐकल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला आहे. अभिनेत्रीने सांगितले कि भाड्याच्या घरामध्ये राहत होते तेव्हा तिच्यासोबत खूपच वाईट वर्तवणूक झाली होती. अपार्टमेंटच्या मालकाने तिला से’क्सुअ’ल फेवर मागितला होता.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एका मुलाखतीमध्ये या कटू अनुभवाबद्दल सांगितले. तिने म्हंटले कि २००९-१० ची हि गोष्ट आहे. त्यावेळी मी पुण्याच्या सिंहगड रोडवर भाड्याच्या एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यावेळी माझे फक्त एक किंवा दोनच चित्रपट रिलीज झाले होते. ज्या अपार्टमेंटमध्ये मी भाड्याने राहत होते ते एका कॉर्पोरेटरचे होते.
तेजस्विनी पुढे म्हणाली कि, जेव्हा भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्याने सरळ मला ऑफर दिली, मला बदल्यात से’क्सुअ’ल फेवर मागितले. टेबलवर एक ग्लास पाणी ठेवले होते. मी तो घाल घेऊन सरळ त्याच्या तोंडावर पाणी मारले. मी त्याला म्हन्लते कि या सर्व गोष्टी करण्यासाठी मी प्रोफेशनमध्ये आलेली नाही. नाहीतर मी या अपार्टमेंटमध्ये राहिलेच नसते.
अभिनेत्रीने सांगितले कि असे दोन गोष्टींमुळे झाले. त्याने मला माझ्या प्रोफेशनमुळे जज केले आणि यामुळे कि माझी आर्थिक परिस्थिती कमजोर होती. हा माझ्यासाठी लर्निंग एक्सपीरियंस होता. तेजस्विनी पंडितच्या या खुलास्यानंतर तिचे चाहते हैराण झाले. अशा स्तितीमध्ये धैर्य राखल्याबद्दल चाहते तेजस्विनीचे कौतुक करत आहेत आणि तिला नेहमीच खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत.
तेजस्विनी पंडित एक मराठी चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अग्ग बाई अरेच्चा चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये डेब्यू केला होता. यामध्ये तिने निगेटिव्ह भूमिका केली होती. तिने चित्रपटाशिवाय टीव्हीवर देखील काम केले आहे. सोशल मिडियावर तेजस्विनी खूपच सक्रीय राहते. इंस्टाग्रामवर तिचे १ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आता या खुलास्यानंतर अभिनेत्री पुन्हा चर्चेमध्ये आली आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.