बऱ्याच दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक मुलगा खूपच सावला दिसत होता आणि त्याच्यासोबत एक मुलगी होती जी खूपच सुंदर होती. या दोघांची सोशल मिडियावर खूपच खिल्ली उडवण्यात आली होती. तर त्याचबरोबर त्यांचे कौतुक देखील झाले होते.हा फोटो साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्दर्शक एटली कुमारचा होता. एटली कुमारने साऊथमधील अनेक मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे त्याने अनेक लव्ह स्टोरी आणि अॅक्शन मूवी बनवल्या आहेत. त्याचबरोबर त्याची लव्ह स्टोरी देखील एखाद्या चित्रपटासारखीच आहे.
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान सोबत देखील तो लवकरच एक चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव जवान आहे जो २ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे. चला तर आपण एटली कुमार बद्दल जाणून घेऊया.फोटोमध्ये दिसत असलेल्या सावल्या रंगाचा मुलाचे सत्य नंतर लोकांच्या समोर आले. तो साऊथ इंडियन चित्रपटामधील एक चर्चित आणि सफल दिग्दर्शक आहे. एटली कुमारने साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस शंकर यांना ५ वर्षे असिस्ट केले आणि नंतर २०१२ मध्ये ३ इडियट्स चित्रपटाचा साऊथ रिमेक करून खूप चर्चेत आला.
एटली कुमारने नंतर आपले एक प्रोडक्शन शुरू केले आणि फॉक्स स्टार स्टूडियोजसोबत मिळून सांगिली बुंगीली काधवा थोरे हा चित्रपट बनवला जो सुपरहिट झाला ओहत. एटली कुमारच्या रिलेशनशिप बद्दल बोलायचे झाले तर तो ८ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर प्रिया कृष्णासोबत विवाह बंधनात अडकला होता.२०१४ मध्ये एटली आणि प्रियाने चेन्नईमध्ये लग्न केले ज्यामध्ये साऊथचे अनेक दिग्गज सेलेब्स उपस्थित होते. कृष्णा प्रिया एक अभिनेत्री आहे जिने साऊथ अनेक अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता एटली कुमार पहिल्यांदाच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानला दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट हिंदीशिवाय मल्याळम, तेलगु, तमिळ आणि कन्नडमध्ये देखील रिलीज होणार आहे.