बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक येतात जातात. यामधील काहींचे स्वप्न अपूर्ण राहते. तर काही इंडस्ट्रीमध्ये स्टार बनतात. तल्लूरी रामेश्वरी देखील अशाच स्टार कलाकारांपैकी एक आहे. तुमच्यापैकी काही लोकांसाठी हे नाव कमी ऐकलेले असेल. जेव्हा एखादा सुपरस्टार अचानक चाहत्यांच्या नजरेमधून गायब होती तेव्हा त्याला लोक विसरून जातात.
तल्लूरी रामेश्वरी ८० च्या दशकामधील एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या बळावर एक ओळख बनवली होती. तल्लूरी रामेश्वरीदुल्हन वही जो पिया मन भाए चित्रपटामधून रातोरात स्टार बनली होती. मोठ मोठे निर्माते तिला आपल्या चित्रपटामध्ये घेण्यसाठी आतुर होते. विशेष म्हणजे रामेश्वरी राजश्रीसारखी हुबेहूब दिसत होती.
दुल्हन वही जो पिया मन भाए चित्रपटानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. तल्लूरी रामेश्वरीने अभिमान आणि अग्निपरीक्षा सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिला आशा चित्रपटासाठी देखील ओळखले जाते. उत्कृष्ट अभिनयासाठी रामेश्वरीला फिल्मफेयरचा फिल्मफेयर.
तल्लूरी रामेश्वरी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले. शुटींग दरम्यान अभिनेत्री घोड्यावरून खाली पडली आणि या अपघातामध्ये तिच्या डोळ्यांना दुखापत झाली. या घटनेनंतर डॉक्टरांनी तिला सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला आणि यासाठी तिला ९ महिने वाट बघायची होती. यासाठी ती अमेरिकेला गेली. ज्यानंतर तिची लाईफ पूर्णपणे बदली. यादरम्यान तिला अनेक चित्रपटांमधून रिप्लेस करण्यात आले.
यादरम्यान अभिनेत्रीने तिचा क्लासमेट आणि पंजाबी अभिनेता प्रोड्युसर दीपक सेठसोबत लग्न केले. पती दिग्दर्शक असून देखील अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये काम केले नाही. माहितीनुसार तिला पंजाबी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती पण तिने नकार दिला, कारण तिला पंजाबी येत नव्हती.
अभिनेत्रीने आता एक बिजनेसवुमन बनली आहे. महेश्वरी सेठ स्कीन केयर स्टार्ट अप बिजनेस ती सांभाळते. अभिनेत्री सध्या आपल्या दोन मुले आणि पतीसोबत खुशहाल आयुष्य जगत आहे. तल्लूरी रामेश्वरी बंटी और बबली, फालतू सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. याशिवाय तिने काही टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे.