स्वरा भास्कर बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिने सपा नेता फहद अहमदसोबत लग्न केले आहे. स्वरा भास्कर आणि तिचा पती आता एकमेकांसोबत खूपच खुश दिसत आहेत आणि दोघांनी आधी कोर्टात लग्न केले आणि नंतर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. स्वरा भास्करच्या रिसेप्शनमध्ये अनेक बडे नेते सामील झाले होते ज्यामध्ये अरविंद केजरीवाल सहित, जया बच्चन आणि अनेक मोठे नेते पाहायला मिळाले.
राहुल गांधी यांनी देखील स्वरा भास्करच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. स्वरा भास्कर ग्रँड रिसेप्शनमध्ये मनोरंजन जगतापासून ते राजकारणापर्यंत अनेक बडे लोकही सहभागी झाले होते. स्वरा भास्करने तिचा लॉंग टर्म बॉयफ्रेंडसोबत लग्न करून अचानक सोशल मिडियावर फोटो शेयर करून लोकांना चकती केले होते.
न्यूली वेड कपल स्वरा आणि फहाद यांच्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी कांग्रेस नेता राहुल गांधी, समाजवादी पार्टीची नेता जया बच्चन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे खासदार शशि थरूर, महाराष्ट्रचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सारखे बडे नेता पोहोचले होते.
स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने रिसेप्शनच्या अगोदर कॅमेऱ्यासमोर भरभरून पोज दिल्या गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेल्या गुलाबी आणि लाल कॉम्बिनेशन लेहेंग्यात स्वरा खूपच सुंदर दिसत होती.