बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. स्वरा भास्कर एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने दर्शकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. स्वरा भास्कर आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे जास्त ओळखली जाते.

स्वरा भास्कर सोशल मिडियाच्या माध्यामातून नेहमी कोणत्याना कोणत्या सामाजिक आणि राजकीय विषयावर आपले मत व्यक्त करत असते. यावेळी देखील ती चर्चेमध्ये आली आहे. पण तिचा चर्चेमध्ये राहण्याचा विषय वेगळाच आहे.

बातमीनुसार स्वरा भास्करने अजूनपर्यंत लग्न केलेले नाही. पण स्वरा भास्कर आता आई बनणार आहे. स्वरा भास्कर एक मुल दत्तक घेणार आहे. तिने मुल दत्तक घेण्यासाठी सेंट्रल एडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी मध्ये रजिस्ट्रेशन देखील केले आहे आणि लवकरच याची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

स्वरा भास्करच्या मुल दत्तक घेण्याच्या तिच्या या निर्णयावर तिचे चाहते तिला अनेक प्रकारची प्रश्ने विचारत आहेत. लग्न केव्हा करणार आणि लग्न न करताच मुल दत्तक का घेणार आहेस. स्वरा भास्कर म्हणाली कि ती अनेक दिवसांपासून मुल दत्तक घेण्याचा विचार करत होती.

स्वरा भास्करच्या या निर्णयाचे समर्थन तिच्या आईवडिलांनी देखील केले आहे. स्वरा भास्करच्या आईने सांगितले कि स्वरा खूपच लवकर आई बनणार आहे. स्वरा भास्कर आपल्या या निर्णयामुळे खूपच खुश आहे.

स्वरा भास्करने सांगितले कि तिला नेहमीच एक खुशहाल आणि आनंदी कुटुंब हवे होते. ज्यासाठी तिने आता एक मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे लोक तिला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. काही लोक स्वरा भास्करच्या या निर्णयाची निंदा करत आहे तर काही लोक तिचे कौतुक करत आहेत.