सुश्मिता सेन ४६ वर्षांची झाली आहे. तिने अजून देखील लग्न केले नाही. पण ती दोन मुलांची आई आहे. तिने तिच्या दोन मुली रेने आणि अलिशाला दत्तक घेतले आहे. आपल्या मुलींचा सांभाळ करण्यामध्ये ती कुठेच मागे राहिलेली नाही. दोन मुली हेच तिचे आयुष्य आहे.
अनेकवेळा असे म्हंटले जाते कि सुश्मिताने या दोन मुलींमुळेच लग्न केलेले नाही. पण यावर सुश्मिता सेनने मोठा खुलासा करत लग्न न करण्याविषयीचे कारण सांगितले आहे. अभिनेत्री म्हणाली कि माझ्या बाबतीत तिने वेळा असे झाले आहे कि माझ्या लग्नाची सर्व तयारी झाली होती.
पण लग्न काही झाले नाही. नववधू बनायच्या आतच तिचे लग्न मोडायचे. पण याला माझ्या मुली कारणीभूत नाहीत. १९९४ साली मिस.युनिव्हर्स राहिलेल्या सुश्मिता सेनने हे स्पष्ट केले आहे तिने दत्तक घेतलेल्या मुली तिच्या अविवाहित राहण्याला कारणीभूत नाहीत.
माझ्या आयुष्यामध्ये तब्बल तिने वेळा लग्न करण्याचा प्रसंग आला पण लग्न काही होऊ शकले नाही. नुकतेच काही महिन्यांपूर्वी सुश्मिताने तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केलं होतं. पण अजून देखील दोघे सेलिब्रेशनच्या निमित्तानं एकत्र येत असतात.
सुश्मिताने तिच्या ब्रेकअपबद्दल सोशल मिडियावरून माहिती देखील दिली होती. तेव्हा तिने कोणतीही कटुता न ठेवता आपण नाते संपल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी तिने तिचा बॉयफ्रेंड रोहमन दोष देखील दिला नव्हता. यामुळे तिचे हे वागणे चाहत्यांना खूपच आवडले होते.
सुश्मिता सेन जेव्हा ट्विंकल खन्नाच्या ट्वीक इंडिया शोमध्ये आली होती तेव्हा तिने सांगितले होते कि माझ्या जबाबदाऱ्या इतर कोणी शेयर कराव्यात असे मला कधीच वाटले नाही. पण कोणी माझ्या जबाबदाऱ्यापासून मला दूर देखील करू नये.
लग्नाबद्दल बोलताना सुश्मिता म्हणाली कि, माझे भाग्य आहे कि मला चांगल्या मुलांना भेटायची संधी मिळाली. पण त्यांच्यासोबत माझ लग्न झालं नाही. याचा माझ्या मुलींशी काहीच संबंध नाही. माझ्या दोन्ही मुलींनी माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या लोकांचा आनंदाने स्वीकार केला आणि हि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती.
सुश्मिता पुढे म्हणाली कि माझे लग्न तीनवेळा होता होता राहिले. तिन्ही वेळा मला देवानेच वाचवले. त्या तीन प्रसंगी मला कोणती संकटे आली होती हे मी सांगू शकत नाही. असेच माझ्या मुलींचे देखील देवाने रक्षण करावे.
View this post on Instagram
मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुश्मिताने दस्तक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने फिजा,आंखे,मैं हूं ना, मैंने प्यार क्यू किया? सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. २०२० मध्ये ती आर्या या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळाली होती.