वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी सूर्यवंशमची अभिनेत्री सौंदर्याने घेतला होता जगाचा निरोप…

By Viraltm Team

Published on:

हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक सूर्यवंशमला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट २१ मी १९९९ मध्ये रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण आज देखील या चित्रपटाच्या खूपच चर्चा होतात. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनसोबत साऊथ इंडियन फिल्म अभिनेत्री सौंदर्या रघु दिसली होती आणि दोघांच्या जोडीला खूप पसंद केले होते. तथापि चित्रपट रिलीज झाल्यानंतर ५ वर्षाने तिचा मृत्यू झाला होता. त्याचे तिचे वय ३१ वर्षे होते.

आपल्या करियरमध्ये अभिनेत्रीने एकूण ११४ चित्रपटांमध्ये काम केले होते. २००४ मध्ये जेव्हा तिचा मृत्यू झाला होता तेव्हा देशामध्ये लोकसभा निवडणुका सुरु होत्या. त्याचबरोबर आंध्र प्रदेश सहित देशाच्या काही इतर प्रदेशांमध्ये निवडणुका होणार होत्या. त्यावेळी लोकसभा मतदारसंघातून विद्या सागर राव निवडणूक लढवत होते. अशामध्ये तेलगु चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री सौंदर्या, विद्या सागर राव यांच्यासाठी आणि टीडीपी च्या नेत्यांसाठी प्रचार करण्यास जात होती. सौंदर्या काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये सामील झाली होती आणि ती त्यावेळी बंगळूरमध्ये होती.
सौंदर्याने गंधर्व या कन्नड चित्रपटामधून १९९२ मध्ये मोठ्या पडद्यावर डेब्यू केला होता. आपल्या करियरमध्ये तिने ११४ चित्रपटांमध्ये काम केले होते. सौंदर्याचा मृत्यू विमान अपघातात झाला ओत. १७ एप्रिल २००४ मध्ये सौंदर्याच्या विमानाने जक्कूर एयरोड्रमवरून उड्डाण केले पण या विमानाचा अपघात झाला. सौंदर्या विमानामध्ये एकटी नव्हती तिच्यासोबत तिचा छोटा भाऊ आणि निर्माता अमरनाथ, भाजपाचे युवा नेता हिंदू जागरण वेदिकाचे स्थानिक प्रमुख रमेश कदम आणि विमानाचे पायलट जॉय फिलिप होते.

या फोर सीटर विमानाने टेक ऑफ केले आणि १०० फुट वर गेल्यानंतर क्लियरेंस घेतला पण काही सेकंदामध्येच ते खूपच हलू लागले. पाहता पाहता ते कृषी विज्ञान विद्यापीठाच्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या मैदानात राष्ट्रीय महामार्ग ७ पासून अवघ्या ५० मीटर अंतरावर कोसळले. तिथे काही मजूर काम करत होते. प्रवाश्यांना वाचवण्यासाठी ती विमानाकडे धावले, मजूर विमानाजवळ पोहोचण्याअगोदर त्याचा स्फोट झाला. ज्यामध्ये काही मजूर देखील जखमी झाले होते.
खूपच कमी वयामध्ये आपली ओळख निर्माण करणारी सौंदर्याचे खरे नाव सौम्या सत्यनारायण होते. सौंदर्याचा जन्म १८ जुलाई १९७२ रोजी कर्नाटकच्या कोलारमध्ये इंडस्ट्रियलिस्ट आणि कन्नड़ चित्रपटाचे लेखक के.एस.नारायण यांच्या घरी झाला होता. २००३ मध्ये सौंदर्याने सॉफ्टवेयर इंजीनियर जी.एस.रघुसोबत लग्न केले होते आणि २००४ मध्ये सौंदर्याने जगाचा निरोप घेतला. सूर्यवंशम चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट आपण लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलो आहोत. अमिताभ बच्चनने या चित्रपटामध्ये डबल रोल केला होता.

Leave a Comment