बॉलीवूडमध्ये काम मिळवणे वाटते तितके सोपे नाही. इथे काम मिळवण्यासाठी हजारो लोक येत राहतात पण त्यामधील काहीच लोक सफल होतात. काहींसोबत असे काही इंसिडेंट होतात जे विसरणे इतके सोपे नसते. यामधील एक नाव सुरवीन चावलाचे आहे, जिने हेट स्टोरी २ आणि फेमस वेब सीरीज सेक्रेड गेम्स मध्ये काम करून आपली ओळख बनवली आहे.
सुरवीनसाठी बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण करणे सोपे नव्हते. सुरुवातीला तिने खूप काही सोसावे लागले. सुरवीनला बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी कास्टिंग काउचचा देखील सामना करावा लागला होता. एका मुलाखतीमध्ये सुरवीनने खुलासा केला होता कि तिला एकदा नाही तर पाच वेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. सुरवीनने म्हंटले होते कि बॉलीवूडमधून तिला २ ते ३ वेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला.
सुरवीनने एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि ती एक साऊथ चित्रपटाची शुटींग करत होती तेव्हा दिग्दर्शकाने तिला विचारले होते कि ते तेव्हाच शुटींग सुरु करतील जेव्हा त्यांची डिमांड पूर्ण केली जाईल. वास्तविक दिग्दर्शकाने सुरवीनला म्हंटले होते कि तिच्या शरीराचा एक एक इंच भाग त्याला पहायचा आहे. त्याचे हे देखील म्हणणे होते कि सुरवीनने तिचे क्लीवेज आणि मांड्या जवळून दाखवाव्यात.
सुरवीनने बॉलीवूडमधील कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगताना म्हंटले कि एकदा ती मुंबईमध्ये एका चित्रपटाच्या निमित्ताने ऑडिशनसाठी पोहोचली होती. या ऑडिशनमध्ये तिला तिची चेस्ट आणि कंबरची साईज विचारली गेली होती. सुरवीनला विचारले गेले होते कि तिचे वजन किती आहे. जेव्हा तिने आपले वजन ५६ किलो सांगितले तेव्हा तिला म्हंटले गेले कि तुझे वजन कमी झाल्यानंतरच तुला काम दिले जाईल.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.