सध्या बॉलीवूड बदलत्या काळानुसार हॉलीवूडला टक्कर देत आहे. एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट बनवले जात आहेत. बॉलीवूडला एक नवीन उंची मिळवून देण्यात बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांचे योगदान आहे. आज बॉलीवूडला संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते. बॉलीवूडमध्ये देखील आता उत्कृष्ट चित्रपट बनू लागले आहेत.
पण आज आपण अशा एका स्टारच्या मुलाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने बॉलीवूडला एक वेगळी ओळख दिली आहे. आपल्या अभिनयाच्या बळावर लोकांना अनेक उत्कृष्ट चित्रपट देणारे अभिनेता राजकुमार चित्रपटांपासून दूर आहेत. पण सुपरस्टार राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमार सध्या आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलीवूडमध्ये उत्कृष्ट काम करत आहे.
एक काळ असा होता जेव्हा राज कुमारचे अनेक चित्रपट लोकांचा दिवाने बनवायचे. आज देखील त्यांच्या चित्रपटाचे कौतुक केले जाते. आता सुपरस्टार राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमार आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे. पुरू राजकुमार आपल्या वडिलांप्रमाणे लोकप्रिय आहे.
पुरू राजकुमार एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. तो दिवंगत अभिनेता राजकुमारचा मुलगा आहे. त्याला हिट अँड रन प्रकरणामध्ये देखील अटक झाली होती. ज्यामध्ये अनेक फुटपाथवर झोपलेले लोक मेले होते. तथापि त्याला कधीच यासाठी दोषी ठरवले गेले नाही. पुरू राजकुमार अभिनेता राज कुमार आणि गायत्रीचा मुलगा आहे. तो तीन भाऊ-बहिणीमध्ये मोठा आहे.
त्याने ग्रेटिट्सबर्ग कॉलेज, पेनसिल्वेनिया मधून अर्थशास्त्र, मनोविज्ञान आणि थिएटरचा कोर्स केला आहे आणि त्याला रॉक क्लाइंबिंग, घोडेस्वारी, स्कूबा डायव्हिंग, टेनिस आणि स्क्वॅशसह अनेक खेळांमध्ये रस आहे. तुम्ही कधी लक्ष दिले नसेल कि तो कोण आहे. तसे तर बॉलीवूडमध्ये नेहमी अनेक स्टार्सची मुले मुली येत राहतात पण पुरूने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
पुरु राजकुमारने १९९६ मध्ये बाल ब्रम्हचारी चित्रपटामधून डेब्यू केला होता. हा चित्रपट त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनंतर रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप झाला होता. तीन वर्षाच्या ब्रेक नंतर पुरूने हमारा दिल आपके पास है चित्रपटामध्ये विलेनची भूमिका केली होती जो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्याने मिशन कश्मीर चित्रपटामध्ये देखील एक कॅमियो रोल केला होता.
यानंतर त्याने उमराव जान चित्रपटामध्ये देखील काम केले. उमराव जाननंतर पुरु राजकुमारने २००७ मध्ये दोष, २००९ मध्ये दुश्मनी, २०१० मध्ये वीर आणि २०१४ मध्ये अॅक्शन जॅक्सन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. राज कुमारची एक मुलगी देखील आहे जिचे नाव वास्तविका राजकुमार आहे. ती देखील एक अभिनेत्री आहे.
काही वर्षांपूर्वी ती त्यावेळी चर्चेमध्ये आली होती जेव्हा अभिनेता शाहीद कपूरने तिच्या विरुद्ध पाठलाग करण्याचा आरोप लावला होता. शाहीद नुसार एक महिला प्रशंसक अनेक दिवसांपासून त्याचा पाठलाग करत होती. नंतर असे समजले कि ती दुसरी कोणी नाही तर राजकुमारची मुलगी वास्तविका राजकुमार होती.