बाहुबली फेम प्रभासने जगभरामध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. साउथ सुपरस्टार प्रभासची फॅन फॉलोइंग देखील खूपच तगडी आहे. प्रभासवर अनेक मुली फिदा आहेत. त्याच्या इंस्टाग्रामवरील फोटोवर मुली अक्षरशः त्याला प्रपोज देखील करत असतात.
आता प्रभासबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. जी ऐकल्यानंतर त्याच्या फिमेल चाहत्यांचे हृदय तुटणार आहे. वास्तविक अभिनेता प्रभास याच वर्षी लग्न करण्याच्या मूड मध्ये आहे. ४२ वर्षाचा झालेल्या प्रभासचे कुटुंबीय २०२२ पर्यंत त्याचे लग्न लावून देण्याच्या विचारात आहेत.
रणबीर-आलिया आणि नयनताराच्या लग्नानंतर आता मनोरंजन इंडस्ट्री आणखी एका बिग फेट वेडिंगसाठी तयार आहे. माहितीनुसार पेन इंडिया स्टार प्रभासचे हात लवकरच पिवळे होऊ शकतात. अभिनेत्याचे कुटुंबीय त्याला लग्नाच्या बेडीत अडकवण्यासाठी तयार झाले आहेत. प्रभासचे काका आणि अभिनेता कृष्णम राजू लवकरच त्याच्या लग्नाची बातमी शेयर करणार आहेत.
माहितीनुसार प्रभासचे काका स्टार कृष्णम राजूने नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान प्रभासच्या लग्नाबद्दल बातचीत केली होती. त्यांनी सांगितले कि प्रभाससाठी त्याची जोडीदारीण निवडली गेली आहे. ज्याबद्दल आम्ही सर्वजण तुम्हाला लवकरच माहिती देऊ.
प्रभासच्या लग्नाच्या चर्चा खूप आधीपासूनच होत आहेत. अभिनेता प्रभासचे नाव बाहुबली फेम अनुष्का शेट्टीसोबत देखील जोडले गेले होते. प्रभास आणि अनुष्का अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना पाहायला मिळाले आहेत. दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूपच पसंद आली आहे. तथापि दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीच ऑफिशियली वक्तव्य केले नाही.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुपरस्टार प्रभासचे सालार आणि आदिपुरुष हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही चित्रपटांमध्ये प्रभासचा एक युनिक अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तर राधे श्याम चित्रपटामध्ये प्रभास शेवटचा पाहायला मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.