सोशल मिडियावर अनेक स्टार्स सक्रीय असलेले पाहायला मिळतात. ते आपल्या चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा तर स्टार्स आस्क मी एनीथिंग सेशनद्वारे चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. अनेकवेळा ते चाहत्यांचा प्रश्नांवर मिश्कील उत्तरे देखील देतात.
असेच काही अभिनेत्री सनी लीओनीसोबत झाले. तिने आपल्या एका चाहत्याला असाच मिश्कील रिप्लाय दिला. स्वतःला सनीचा चाहता म्हणणाऱ्या या व्यक्तीचे नाव एएम खान आहे. या व्यक्तीला सिगरेटची खूप सवय आहे. तर या व्यक्तीने चक्क सिगरेट सोडण्याची एक अट ठेवली. ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.
पाकिस्तानच्या एएम खानने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आणि लिहिले कि जर सनी लीओनीने रिप्लाय केला तर मी सिगरेट सोडून देणार. यावर लोकांनी अनेक मजेदार कमेंट्स देखील केल्या. लोकांना हैराणी तेव्हा झाली जेव्हा स्वतः सनीने या पोस्टवर रिप्लाय दिला.
लोकांच्या कमेंट्सनंतर सनी लीओनीने त्यावर रिप्लाय दिला. सनीने लिहिले कि तू आता सिगरेट कधी सोडणार आहेस ? सनीचे हे उत्तर सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. सनीच्या रिप्लायला १२ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
हि पोस्ट जेव्हा व्हायरल झाली तेव्हा त्या व्यक्तीने आपली पोस्ट एडीट केली आणि नवीन कॅप्शन देखील लिहिले. आता अनेक सोशल मिडिया युजर्सने आपल्या फेवरेट स्टार्सला टॅग करत स्मोकिंग सोडण्याची बातचीत केली आहे. आता असा एक वेगळाच ट्रेंड सुरु झाला आहे.