लिव-इनमध्ये राहत आहेत सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहुल, लग्नाच्या प्रश्नावर सुनील शेट्टी म्हणाला; जेव्हा मुले निश्चित…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुलचे नाते कोणापासून लपलेले नाही. दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. केएल राहुल आणि अथिया मिडियासमोर एकमेकांनाबद्दल काहीच बोलत नाहीत पण सोशल मिडियावर दोघे एकमेकांबद्दल प्रेम दाखवण्याची संधी कधीच सोडत नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून दावा केला जात आहे कि अथिया आणि केएल राहुल लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाबद्दल देखील मोठी बातमी समोर आली आहे. आता अथिया शेट्टीचे वडील अभिनेता सुनील शेट्टीने कपलच्या लग्नाबद्दलच्या प्लानिंगवर बातचीत केली आहे.

सुनील शेट्टीला नेहमी अथिया शेट्टी आणि केएल राहुलसंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यांना या प्रश्नांचा सामना लेटेस्ट मुलाखतीमध्ये देखील करावा लागला. अभिनेत्याला अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल विचारले गेले. यावर सुनील शेट्टी उत्तर देताना म्हणाला कि मला वाटते जेव्हा मुले निश्चित करतील. राहुलचा आता आशिया कप आहे, वर्ल्ड कप आहे, साउथ अफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया टूर आहे. अशामध्ये जेव्हा मुलांना ब्रेक मिळेल तेव्हा त्यांचे लग्न होईल. रेस्ट डे मध्ये लग्न होऊ शकत नाही.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. गेल्या एका रिपोर्टमध्ये असा अंदाज केला गेला आहे कि केएल राहुल आणि अथिया शेट्टी एकाच घरामध्ये शिफ्ट झाले आहेत. दोघांना बांद्राच्या कार्टर रोडवर एक घर मिळाले आहे जिथे ते एकत्र राहत आहेत.

नवीन घरामध्ये एकत्र शिफ्ट झाल्यानंतर लग्नाच्या बातम्यांनी आता जोर धरला आहे. तथापि सध्या केएल राहुल झिम्बाब्वेसोबतच्या क्रिकेट सामन्यांमध्ये व्यस्त आहे. दरम्यान आपल्या लग्नाच्या बातम्यांवर स्वतः अथिया शेट्टीला देखील समोर येऊन आपली प्रतिक्रिया द्यावी लागली होती. गेल्या काही दिवसांमध्ये तिने स्टोरी शेयर करून लिहिले होते कि मला अशा आहे कि मला ३ महिन्यांमध्ये होणाऱ्या लग्नामध्ये आमंत्रित केले जाईल.

Leave a Comment