अथिया आणि केएल राहुलच्या हळदी सेरेमनीसाठी असे सजवण्यात आले होते सुनील शेट्टीचे खंडाळ्याचे फार्महाऊस, व्हायरल झाले INSIDE PICS…

By Viraltm Team

Published on:

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुलने नुकतेच लग्न केले आहे, ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यादरम्यान अभिनेत्री अथियाने आपल्या हळदी सेरेमनीचे फोटो देखील चाहत्यांसोबत शेयर केले, ज्यामध्ये ती आपल्या कुटुंबासोबत मस्ती करताना दिसत आहे. तथापि चाहते अभिनेत्रीचे हे फोटो पाहून तिच्या घराच्या डेकोरचा अंदाज लावत आहेत. पण आता हळदी सेरेमनीसाठी तिचे घर कसे सजवण्यात आले होते याचे फोटो समोर आले आहेत.

सोशल मिडियावर व्हायरल फोटोमध्ये सुनील शेट्टीचे खंडाळा येथील घराची झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये हळदी सेरेमनीसाठी घराला पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. पायऱ्यांपासून ते छताचा कोपरा देखील फुलांनी सजवण्यात आला आहे. तर घराच्या गार्डनची हिरवळ हळदी सेरेमनीला एक वेगळाच लुक देत आहे.

हळदी सेरेमनीबद्दल बोलायचे झाले तर वधू अथियाने गोल्डन पीच-पिंक सूट घातला होता तर राहुलने आयवरी कलरचा कुर्ता घातला होता. दोघे या हळदी सेरेमनीमध्ये खूपच खुश दिसत होते. तर सुनील शेट्टीदेखील आपल्या मुलीचा लग्नाचे फोटो शेयर केले होते ज्यामध्ये तो आपली मुलगी, जावई, पत्नी आणि व्याहींसोबत पाहायला मिळत आहेत. फोटो शेयर करताना सुनील शेट्टीने खास कॅप्शन देखील लिहिले आहे.

क्रिकेटर केएल राहुल आणि अथियाने गेल्या मंगळवारी अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा स्थित फार्महाऊसवर लग्न केले ज्यानंतर ते पापाराझींसाठी पोज देताना देखील दिसले. तर अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी आणि त्याचा मुलगा मिडियावाल्यांना मिठाई वाटताना पाहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rani Pink (@ranipinklove)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rani Pink (@ranipinklove)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rani Pink (@ranipinklove)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rani Pink (@ranipinklove)

Leave a Comment