भारताचे दुसरे अंबानी आहेत सुनील शेट्टी, सुनील शेट्टींची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविणारा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीला कोण नाही ओळखत. सुनील शेट्टीने आपल्या करियरची सुरुवात अॅक्शन हिरो म्हणून केली होती. त्याचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकच्या बंगळुरूजवळील मुल्की येथे झाला होता. सुनील शेट्टी आता ६० वर्षांचा झाला आहे पण त्याच्या वयाचा फक्त आकडाच वाढला आहे. आज देखील तो फिटनेच्या बाबतीत नवीन अभिनेत्यांना टक्कर देतो.

३० वर्षाच्या आपल्या फिल्मी करियरमध्ये मेहनतीच्या जोरावर त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली. तो फक्त बिजनेसनेच करोडो रुपयांची कमाई करतो. सुनील शेट्टीने फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नाही तर साउथ चित्रपटांमध्ये देखील काम केले. चला तर सुनील शेट्टीच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

सुनी शेट्टीने १९९२ मध्ये रिलीज झालेल्या बलवान चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती मुख्य भूमिकेमध्ये होती. सुनील शेट्टीचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

यानंतर त्याने आपल्या करियरमध्ये गोपी किशन’, मोहरा, सपूत, बॉर्डर, धड़कन, मैं हूं ना, रक्षक, हेरा फेरी आणि दिलवाले सारख्या सुपर चित्रपटांमध्ये काम केले. त्याची प्रत्येक जोडी दर्शकांना खूपच आवडली. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि फिल्मी जगतामध्ये येण्यापूर्वी सुनील शेट्टीने १९९१ मध्ये त्याची गर्लफ्रेंड माना सोबत लग्न केले होते.

यानंतर त्याच्या घरी दोन मुलांचा जन्म झाला. त्याच्या मुलीचे नाव आथिया शेट्टी आहे तर मुलाचे नाव अहान शेट्टी आहे आथिया फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे. सुनील शेट्टीने आपल्या करीयरमध्ये जवळ जवळ १२० चित्रपटांमध्ये काम केले आणि त्याचे बहुतेक चित्रपट हे सुपरहिट झाले.

सुनील शेट्टीची पत्नी माना एक बिझनेसवुमन आहे तर सुनील शेट्टी देखील आपल्या बिजनेसद्वारे करोडो रुपयांची कमाई करतो. सुनील शेट्टीने भागम भाग आणि खेल सारखे चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. याशिवाय त्याच्याजवळ मुंबईमध्ये स्वतःचे आलिशान रेस्टोरेंट आहे. जिथून तो तगडी कमाई करतो. फक्त मुंबईमध्येच नाही तर साऊथ इंडियामध्ये त्याने आपल्या पॉपुलर रेस्टोरेंटची चैन बनवली आहे.

याशिवाय सुनील शेट्टीचे आर नावाने लग्जरी फर्नीचरचे शोरूम देखील आहे. जिथून त्याला मोठी कमाई होते. पत्नी माना देखील सुनील शेट्टीच्या बिजनेसमध्ये मदत करते. माहितीनुसार सुनील शेट्टी फक्त आपल्या बिजनेसनेच १०० करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो.

याशिवाय सुनील शेट्टीजवळ मुंबईमध्ये एक आलिशान बंगला देखील आहे. तर खंडाळा हिल स्टेशनमध्ये देखील त्याचे लग्जरी फार्म हाउस आहे. याशिवाय सुनील शेट्टीजवळ मर्सिडीज़ GLS ३५० D, हमर, रेंज रोवर वॉग सारख्या लग्जरी कार देखील आहेत.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment