शाहरुख आणि गौरी खानची लाडकी मुलगी सुहाना खान लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहाना खानची मोठी फॅन फॉलोइंग झाली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात. मंगलवारी सुहानाला पॅप्सनी स्पॉट केले पण यावेळी तिला खूपच ट्रोल केले गेले. तिच्या कपड्यांवरून युजर्स कमेंट्स करू लागले.
सुहाना कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने ब्लॅक रंगाच्या टॉपवर हुडी घातली होती. त्याचबरोबर फिट्ट टाइट्स घातले होते. सुहानासोबत तिचे बॉडीगार्ड्स देखील होते. तिच्या कपड्यांवरून युजर्स कमेंट करू लागले. एकाने म्हंटले कि इतके फिट्ट का घालायचे. तर एकाने कमेंट केली कि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक बोरिंग चेहरा पाहायला मिळणार.
दिवाळी दरम्यान सुहानाने आपल्या पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये सुहाना खानने गोल्डन कलरची ग्लिटर साडी घातली होती. चाहत्यांनी तिच्या लुकचे खूपच कौतुक केले होते. सुहानाने जे फोटो शेयर केले होते त्यावर शाहरुख खानने देखील कमेंट केली होती. शाहरुखने लिहिले होते ज्या स्पीडने तू मोठी होत आहेस यावेळी, सौंदर्य दिसून येते. तू हि साडी घातली आहेस का?
सुहाना खान दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात खुशी कपूर, अगस्त्य नंदा हे देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या दोघींहि हा पहिलाच चित्रपट आहे. ‘द आर्चीज’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram