धर्मेंद्र पासून शिल्पा पर्यंत, रेस्टॉरंट चालवून करोडोंची कमाई करतात हे स्टार्स, कोणी चहा विकतो तर कोणी सीफूड…

By Viraltm Team

Updated on:

अनेक बॉलीवूड सेलेब्स असे आहेत जे अभिनयाशिवाय साईड बिजनेस देखील करतात. ते साईड बिजनेस करून करोडो रुपयांची कमाई करतात. यामधील अनेक सेलेब्स असे आहेत जे रेस्टॉरंट चालवतात आणि या माध्यमातून त्यांची चांगली कमाई होते. आज आपल्या अशा काही बॉलीवूड कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत जे रेस्टॉरंट चालवून करोडोंची कमाई करतात.
शिल्पा शेट्टी: प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी एक नाही तर दोन रेस्टॉरंटची मालकीण आहे. तिचे वरळीमध्ये बॅस्टन चेन रेस्टॉरंट आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारात फूड उपलब्ध आहे. नुकतेच शिल्पाने एक रेस्टॉरंटही उघडले आहे.
सुनील शेट्टी: प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी देखील उद्योगपती होता आणि अजूनही आहे. मुंबईत त्यांचा डायनिंग बार आणि क्लब आहे. ‘अण्णा’ सुनील शेट्टी या व्यवसायातून भरपूर कमाई करतो.
धर्मेंद्र: या लिस्टमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे देखील नाव आहे. ८७ वर्षीय धर्मेंद्र ‘गरम-धरम’ ढाबा चेन चालवतात. देशातील अनेक शहरांमध्ये या ढाब्याची फ्रेंचायझी आहे. नुकतेच धरमजींनी ‘ही मॅन’ नावाचे दुसरे रेस्टॉरंट उघडले आहे. धर्मेंद्र यांना ‘ही मॅन’ देखील म्हटले जाते.
बॉबी देओल: बॉबी देओलने वडील धर्मेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर वडिलांच्या मार्गावर चालत त्यांने व्यवसाय सुरू केला. बॉबी देओल मुंबईतील अंधेरी येथे ‘सॅम्पल्स अॅलेस’ नावाच्या रेस्टॉरंटचा मालक आहे. येथे ग्राहकांना स्वादिष्ट भारतीय आणि चायनीज पदार्थ चाखायला मिळतात.
प्रियांका चोप्रा: प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील साईड बिजनेस करते. लग्नानंतर ती पती निक जोनाससोबत अमेरिकेत राहत आहे. २०२० मध्ये तिने न्यूयॉर्कमध्ये सोना नावाचे रेस्टॉरंट उघडले होते. येथे भारतीय जेवण मिळते. प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलिब्रिटी आले आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली: दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील रेस्टॉरंट चालवतात. अनुष्का आणि विराटने काही दिवसांपूर्वी दिवंगत बॉलिवूड गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात ‘वन ८ कम्युन’ नावाचे रेस्टॉरंट उघडले होते.
डिनो मोरिया: राज चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता डिनो मोरिया बॉलिवूडमध्ये अपयशी ठरला. यानंतर त्याने व्यावसायिक जगतात हात आजमावला. तो मुंबईत कॅफे चालवतो. याआधी त्यांने एक जिमही उघडली होती.

Leave a Comment