आलिया-रणबीरनंतर आता बॉलीवूडचे ‘हे’ स्टार कपल होणार मम्मी-पप्पा, सलमान खानने केला खुलासा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या आगामी भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वरून त्याच्या चित्रपटासाठी खूपच उत्साही दिसत आहे. वरुण धवन आणि कृती सेनन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस १६ च्या मंचावर पोहोचले होते.

जिथे कृती आणि वरुणने मिळून सलमान खानसोबत खूपच मजा मस्ती केली. सलमान खानने वरुण धवनच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले. जेव्हा वरुण धवन आणि कृती सेनन बिग बॉसच्या मंचावर पोहोचले तेव्हा दोघांनी स्वतःला सलमान खानचे खास चाहते असल्याचे सांगितले.

सलमान खानच्या समोर दोघांनी गेम देखील खेळली. गेमच्या शेवटी सलमान खानने कृतीला बिग बॉसचा डोळा आणि वरुण धवनला भेट म्हणून एक सॉफ्ट टॉय दिला. गिफ्ट बघितल्यानंतर वरुण धवनने म्हंटले कि मी याचे काय करू कारण अजून मला मुल नाही. वरुण धवनचे म्हणणे ऐकल्यानंतर सलमान खान म्हणाला कि हे टॉय आले आहे तर मुल देखील येईल.

सलमान खानच्या या गोष्टीवर वरुण धवन काहीही न बोलता खाली मान घालून लाजू लागला. वरुण धवन-नताशा दलाल लवकरच मम्मी पप्पा होणार आहेत हे तर सलमान खानचे कुठेतरी संकेत दिसत आहेत. आलीया भट्ट आणि रणबीर कपूर एका गोड मुलीचे आईवडील बनले आहेत.

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी १२ नोव्हेंबरला एका गोड मुलीचा जन्म झाला आहे. अशामध्ये बॉलीवूड स्टार्सच्या बेबी वेलकम सीजनमध्ये वरुण धवनच्या घरी देखील एखाद्या लहानग्या पाहुण्याचे आगमण होऊ शकते असा चाहते अंदाज लावत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Leave a Comment