जगातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल रोजी झाला होता. सचिन आता ४९ वर्षाचा झाला आहे. सचिनने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि २४ वर्षे क्रिकेट जगतावर राज्य केल्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये त्याने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईच्या दादर भागामध्ये निर्मल नर्सिंग होममध्ये राजपूरच्या एका मराठी ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर होते जे एक सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते आणि आईचे नाव रजनी तेंडुलकर अह्गे. त्याचे वडील रमेश तेंडुलकरने त्यांचे आवडते संगीतकार सचिन देव बर्मनच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव ठेवले होते.
सचिन तेंडुलकर आपल्या वडिलांचा चार मुलांपैकी एक दुसऱ्या नंबरचा मुल्ता आहे. त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर आणि त्याच्या लहान भावाचे नाव नितीन तेंडुलकर आहे आणि सर्वात लहन एक बहिण आहे जिचे नाव सविताई तेंडुलकर आहे. मोठा भाऊ अजित तेंडुलकरनेच सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले होते.
त्यांनी दादर स्थित शारदा आश्रम विद्या मंदिर मधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. इथे ते क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्या संपर्कामध्ये आले आणि आपल्या क्रिकेट करियरची सुरुवात केली. सुरुवातीला सचिन शिवाजी पार्कमध्ये अनेक तास क्रिकेटचा सराव करायचा आणि नंतर एम आर एफ पेस फाउण्डेशनच्या सराव कार्यक्रमामध्ये वेगवान गोलंदाज होण्यासाठी सराव केला.
गोलंदाजीचे कोच डेनिस लिलीने त्याच्या फलंदाजीची प्रतिभा पाहून त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि इथूनच सचिनने फलंदाजीकडे जास्त लक्ष दिले आणि जगातील सर्वात महान फलंदाज म्हणून आपले नाव कमवले.
१९९० मध्ये तो अंजली मेहताला भेटला आणि २४ मे १९९५ मध्ये त्याने अंजलीसोबत लग्न केले. नंतर १२ ऑक्टोबर १९९७ रोजी त्याला एक मुलगी झाली जिचे नाव सारा आहे आणि त्यानंतर २४ सप्टेंबर १९९९ रोजी त्याला मुलगा झाला ज्याचे नाव अर्जुन आहे.
सुरुवातीला शालेय जीवनापासून सचिन आपल्या मोठ्या भावासोबत मुंबईच्या लोक टीममध्ये खेळत होता आणि तेव्हा त्याची भेट रमाकांत आचरेकरसोबत झाली जे क्रिकेट कोच होते. नंतर त्यांनी क्लब क्रिकेटमध्ये देखील भाग घेण्यास सुरुवात केली. त्याच्या क्रिकेट करियरमध्ये नवीन वळण तेव्हा आले जेव्हा १४ नोव्हेंबर १९८७ रोजी रणजी ट्रॉफीसाठी त्याची निवड मुंबई टीमसाठी करण्यात आली. पण त्याची निवड अतिरिक्त खेळाडू म्हणून करण्यात आली होती.
सचिनने आपल्या करियरची सुरुवात १५ व्या वर्षी ११ डिसेंबर १९८८ रोजी मुंबई टीमकडून गुजरात विरुद्ध आपल्या पहिला स्थानिक क्रिकेट मधून केली. त्याने आउट न होता १०० धावांची खेळी केली. त्यांनी १७ व्या वर्षी कराचीमध्ये आपला पहिला टेस्ट सामना १५ नोव्हेंबर १९८९ रोजी खेळला. यानंतर १८ डिसेंबर १९८९ रोजी जिन्ना स्टेडियममध्ये त्याने आपल्या पहिला एकदिवसीय सामना खेळला.
१८ मार्च २०१२ रोजी त्याने आपला अंतिम एकदिवसीय सामना पाकिस्तानमध्ये खेळला आणि २३ डिसेंबर २०१२ रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने निवृत्ती घोषित केली. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी त्याने आपला अंतिम टेस्ट सामना वेस्ट इंडीज विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये खेळला आणि क्रिकेट जगतामधून त्याने निवृत्ती घोषित केली आणि दोन दिवसानंतर त्याला भारत सरकारने भारत रत्न म्हणून सन्मान देण्याची घोषणा केली.
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने वनडे क्रिकेटमध्ये भारतीय टीमला अनेक सामन्यांमध्ये शानदार सुरुवात करून दिली. वीरेंद्र सेहवाग वनडे क्रिकेटमध्ये आल्यानंतर गांगुलीने ओपनिंग न करता मिडिल ऑर्डरमध्ये खेळायला सुरुवात केली होती.