लग्नाच्या दीड वर्षानंतरच सौरव गांगुलीच्या आयुष्यात बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने केली होती एन्ट्री !

By Viraltm Team

Updated on:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने बीसीसीआय मधील धुसफूसीबद्दल आपले मत व्यक्त केले होते. त्याचे असे मानणे होते कि अलीकडच्या काळामध्ये बोर्डामध्ये सर्व काही ठीक चाललेले नाही आणि तो हे सर्व ठीक करेल. गांगुलीच्या वैयक्तिक आयुष्यात देखील असाच काळ आला होता जेव्हा सर्व काही व्यवस्थित नव्हते. पत्नी डोना गांगुलीच्या समजुतीमुळे गांगुलीचे कुटुंब तुटण्यापासून वाचले होते.

गांगुलीने १९९२ मध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यातून पदार्पण करून आपल्या क्रिकेट करियरची सुरवात केली होती. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी डोना आणि सौरव गांगुली यांची लव स्टोरी आदर्श मानली जाते. गांगुलीने १९९७ मध्ये आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध जात त्याची बालपणीची मैत्रीण डोनासोबत लग्न केले होते. मात्र त्यांच्या लग्नाला दीड वर्षदेखील झाले नव्हते कि गांगुलीच्या आयुष्यात एका बॉलीवूड अभिनेत्रीने एन्ट्री केली.आश्चर्यचकित होऊ नका. ती अभिनेत्री दुसरी कोणीही नसून दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री नगमा होती. नगमाचे खरे नाव नंदिता अरविंद मोरारजी असे आहे. ती आता कॉंग्रेसची नेता आहे. १९९९ मध्ये विश्वचषकादरम्यान त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर एक बातमी देखील समोर आली होती कि चेन्नईपासून ४० किलोमीटर दूर एका मंदिरामध्ये हे दोघे पूजेसाठी गेले होते. २००० मध्ये गांगुली आणि नगमा यांच्या मध्ये रिलेशनशिपच्या खूप चर्चा उठल्या होत्या.

जरी या दोघांनी आपल्या अफेअरबद्दल कोठेही वाच्यता केली तरी या प्रकरणामुळे गांगुलीच्या वैवाहिक जीवनामध्ये खूपच उलथा पालथ झाली होती. असेसुद्धा म्हंटले जाते कि त्यावेळी डोना गांगुली इतकी नाराज होती कि तिने गांगुलीसोबत घटस्फोट घेण्याचादेखील निर्णय घेतला होता. परंतु तिने नंतर संयम दाखवत अशा बातम्यांसाठी मिडीयाला पूर्णपणे जबाबदार धरत आपला निर्णय मागे घेतला. हा त्यांचा समजूतदारपणा आणि गांगुलीवरचा विश्वासच होता कि ज्यामुळे नगमासोबत गांगुलीचे ब्रेकअप झाले आणि एक कुटुंब तुटण्यापासून वाचले.काही वर्षांपूर्वी नगमाने हे कबूलदेखील केले होते कि ते एकमेकांना खूप पसंत करत होते. परंतु फारच कमी वेळ एकत्र राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. नगमाच्या नुसार टीम इंडियाचा पराभव तिच्या आणि गांगुलीच्या ब्रेकअपचे मुख्य कारण बनले. नगमाचे असे मानणे आहे कि भारतामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाला लोकं नेहमी जोडून पाहत असतात. आणि हे खूप चुकीचे आहे. आमच्या दोघांचे नातेदेखील याच कारणामुळे संपुष्टात आले. तथापि आम्ही एकमेकांच्या संमतीने वेगळे झालो. नगमा अजूनही अविवाहितच आहे.

Leave a Comment