बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार झाले ज्यांनी सुरुवातीलाच चाहत्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले पण कधीच मोठे स्टार बनू शकले नाहीत. यामध्ये बॉलीवूड अभिनेता विवेक मुशरानचे देखील नाव सामील आहे. ९ ऑगस्ट १९६९ रोजी जन्मलेल्या विवेक मुशरान सध्या त्याच्या ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. विवेकने सौदागर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती या चित्रपटामधून तो रातोरात फेमस झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि निरागस डोळे यांनी दर्शकांची मने जिंकली होती.
त्याला एकमागून एक अनेक चित्रपट मिळत गेले पण इतर कलाकारांसारखे तो सुपरहिट हिरो बनू शकला नाही. एक काळ असा आला कि त्याचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला. तथापि मोठ्या पडद्यासोबत त्याने छोट्या पडद्यावर देखील काम केले.
विवेक फक्त २१ वर्षाचा होता तेव्हा त्याला सौदागर चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटामध्ये राजकुमार आणि दिलीप कुमार सारखे दिग्गज कलाकार देखील होते पण तरीही विवेकने आपल्या कौशल्याने दर्शकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. या चित्रपटामधील विवेक आणि मनीषा कोईराला यांच्यावर चित्रित केलेले ईलू-ईलू गाणे सुपरहिट झाले होते.
सौदागरनंतर विवेक सातवां आसमान, बेवफा से वफा आणि रामजाने चित्रपटामध्ये देखील दिसला. त्यावेळी त्याने अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले पण हळू हळू त्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि तो चित्रपटांमधून गायब होऊ लागला. काही वर्षे तो चित्रपटांपासून दूर होता पण २००० मध्ये आलेल्या अंजाने चित्रपटामधून त्याने पुनरागमन केले. पण यावेळी देखील तो यशस्वी होऊ शकला नाही.
याशिवाय विवेक बेताब, छोटा सा घर, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, बात हमारी पक्की है सारख्या अनेक चित्रपट आणि शोमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर त्याने सोन परी, निशा और उसके कजिन्स, परवरिश सारख्या हिट शोमध्ये देखील काम केले. कधी काळी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणारा विवेक चित्रपटांमध्ये आणि शोमध्ये सपोर्टिंग रोल करू लागला.
View this post on Instagram
विवेक तमाशा, पिंक, बेगम जान आणि वीरे दी वेडिंग चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. विवेकने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपले नशीब आजमावले आहे. तो मर्जी, नेवर कीस युवर बेस्ट फ्रेंड, द हार्टब्रेक हॉटेल आणि बँड यासारख्या वेब सीरिजमध्ये देखील काम करताना दिसला आहे. विवेकचा लुक खूपच बदलला आहे आणि तो अजून देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे.