सोनू सूद पुन्हा बनला देवदूत…! ४ हात आणि ४ पाय असलेल्या मुलीला दिले नवीन जीवन…

By Viraltm Team

Published on:

अभिनेता सोनू सूदला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो नेहमी कोणालाना कोणाला मदत करत असताना पाहायला मिळतो. तो रियल लाईफमध्ये एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. तो नेहमी लोकांच्या मदतीसाठी तयार असतो. आता पुन्हा एकदा त्याने हृदय जिंकण्यासारखे काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्या आई वडिलांसोबत एक मुलगी पाहायला मिळाली होती जिच्या पोटामधून दोन हात आणि दोन पाय बाहेर आले होते. दीड वर्षाची चौमुखी कुमारी नवादा जिल्ह्यातील वारसलीगंजच्या सौर पंचायतमधील हेमदा गावाची रहिवाशी आहे.

चौमुखी कुमारीचे सुरतच्या एका हॉस्पिटलमध्ये सफलतापूर्वक ऑपरेशन केले गेले आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर चौमुखीचे ऑपरेशन झाले. सोनू सूदने चौमुखीचे ऑपरेशन करून तिला नवीन जीवन दिले आहे.

चौमुखीला जन्मापासूनच ४ हात आणि ४ पाय होते. सोशल मिडियावर हि गोष्ट व्हायरल झाल्यानंतर सोनू सूदने आपल्यातर्फे मुलीचे ऑपरेशन करण्याची घोषणा केली होती. आता चौमुखी कुमारी सामान्य मुलाप्रमाणे खेळू शकते.

सौर पंचायतचे सरपंच गुडिया देवीचे पती दिलीप राऊत, चौमुखी आणि तिच्या कुटुंबाला घेऊन ३० मे रोजी मुंबईला आले होते. मुंबईला पोहोचल्यानंतर सोनू सूदने चौमुखीची भेट घेतली आणि तिचा इलाज करण्यासाठी सुरतला पाठवले. सुरतमध्ये एक्स्पर्ट डॉक्टरांच्या टीमने चौमुखीचे मेडिकल चेकअप केले होते. यानंतर किरण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मिथुन आणि त्यांच्या टीमने जवळजवळ ७ तासामध्ये चौमुखीची सफल सर्जरी केली.

सरपंचाचे पती दिलीप राऊतने या चांगल्या कामासाठी सोनू सूदचे मनापासून आभार मानले आहेत. सध्या चौमुखीला काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल. यानंतर ती एका सामान्य मुलांसारखे राहू शकेल. सोनू सूदने चौमुखीच्या सर्जरीवर येणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलली आहे.

Leave a Comment