बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या गरोदरपणामुळे खूपच जास्त चर्चेमध्ये आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपण गरोदर असल्याचे सांगितले होते आणि पाहता पाहता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.
सध्या सोनम तिच्या पती आनंद अहुजासोबत आपल्या गरोदरपणातले खास क्षण घालवत आहे. गरोदरपणामध्ये स्त्रियांचे वजन वाढणे स्वाभाविक आहे, आणि चेहऱ्यावर देखील एक वेगळी चमक येते. सोनमच देखील असेच झाले आहे.
नुकतेच सोनमने एक फोटो शेयर केला होता ज्यामध्ये तिचे रूप इतके बदललेले दिसत आहे कि तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. सोनमने मेकअप न करता हा फोटो शेयर केला आहे. नुकतेच सोनमने एक मुलाखत दिली होती.
त्यामध्ये तिने सांगितले कि गरोदरपणातले पहिले तीन महिने खूपच कठीण गेले होते. सोनमचा हा लुक पाहिल्यानंतर नेटकरी तिच्या फोटोवर कमेंट करून विचारत आहेत, तुम्ही कोण? फोटो पाहता सोनमचे वजन चांगलेच वाढलेले दिसत आहे.
सोनम कपूर खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामावर जास्त भर देताना दिसत आहे. यासोबत सोनमचा फॅशन सेन्स कमी झालेला दिसत नाही. आता सोनम गरोदरपणानंतर आपली फिगर कशी मेंटेन करते हेच पाहण्यासारखे राहील.