बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने २० ऑगस्ट रोजी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. सोनम आणि आनंद अहुजाने त्यांच्या मुलाचे नाव वायु कपूर आहूजा ठेवले आहे. तथापि अजूनदेखील त्यांच्या त्यांच्या मुलाची झाली पाहायला मिळालेली नाही. असो सोनम सध्या तिच्या मुलाच्या संगोपनात व्यस्त आहे.
याशिवाय ती आपल्या बॉडीला पुन्हा शेपमध्ये आणण्यासाठी जिममध्ये घाम देखील गाळत आहे. यादरम्यान नुकतेच सोनम कपूर मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाली. आता तिचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. प्रेग्नंसीनंतर पहिल्यांदाच सोनम कपूरचा स्टायलिश लूक चाहत्यांना पाहायला मिळाला.
व्हिडीओमध्ये सोनम कपूर ऑल ब्लॅक लुकमध्ये दिसत आहे. जिथे काही लोक सोनमच्या लुकचे कौतक करत आहेत तर काही लोक तिच्या प्रेग्नंसी वेटमुळे तिला ट्रोल करत आहेत. सोनमच्या एका चाहत्याने तिचे कौतुक करत कमेंटमध्ये लिहिले आहे कि, तू खूपच वेगाने प्रेग्नंसी फॅट बर्न केले.
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि तू फिगर मेंटेन केलीसच. याशिवाय काही लोक सोनम कपूरच्या या लुकवर संतुष्ट नाहीत. एका युजरने लिहिले आहे तू खूपच मोठी झाली. लवकर काहीतरी कर. असो एकूणच बहुतेक लोक सोनम कपूरचे कोतूकच करत आहेत.
सोनम कपूरने २० ऑगस्ट २०२२ रोजी तिचा मुलगा वायूला जन्म दिला होता. तिने इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली होती. ताठी अजून देखील सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक दिवस झाले कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही, पण लवकरच ती बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
View this post on Instagram